मुंबई
Amitabh Bachchan महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर सध्या दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आयुष्यातील जवळच्या मित्राचे निधन झाल्याने अभिनेते भावनिक अवस्थेत आहेत. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर या दु:खद प्रसंगाबाबत काहीही नाव किंवा कारण स्पष्ट केलेले नाही; मात्र त्यांच्या पोस्टमधून दिसून येते की, त्यांनी आयुष्यातील एका अत्यंत खास व्यक्तीला गमावले आहे.
८३ वर्षीय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी १२ मार्च रोजी संध्याकाळी ३.५० वाजता ब्लॉगवर एका भावनिक पोस्टद्वारे मित्राबरोबरच्या जुन्या आठवणी ताज्या केल्या. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आणखी एका प्रिय मित्राला गमावलं आहे… एक अशी व्यक्ती जी प्रचंड स्नेह आणि विनोदबुद्धीने संपन्न होती… कोणत्याही परिस्थितीत त्याने कधीच दुःख व्यक्त केले नाही. फक्त परिस्थितीतून मार्ग काढत राहिला… त्याच्या चेहऱ्यावर फक्त आनंद दिसायचा… विश्वास होत नाही की, आता तो आमच्यात नाही… एक एक करून सगळे सोडून जात आहेत…” या पोस्टसोबत त्यांनी रडणारा इमोजीही शेअर केला.