'अनुपमा’ मालिकेत मोठा लीप

13 Mar 2026 11:27:50
मुंबई,
Anupamaa serial स्टार प्लसवरील लोकप्रिय मालिका अनुपमा गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. भावनिक कथानक, कुटुंबातील गुंतागुंतीचे संबंध आणि सतत येणाऱ्या अनपेक्षित ट्विस्टमुळे ही मालिका टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक ठरली आहे. अनेक वर्षांपासून प्रेक्षक या कथेशी भावनिकरीत्या जोडले गेले असून मालिकेतील प्रत्येक वळण उत्सुकतेने पाहिले जाते.
 

Anupamaa serial, Anupamaa latest twist, 
सध्या मालिकेच्या कथानकात मोठा लीप दाखवण्यात आला आहे. या लीपनंतर अनुपमा तिच्या आयुष्याचा एक नवा अध्याय सुरू करताना दिसणार आहे. नव्या कथानकात ती गोव्यात नव्याने आयुष्य उभारण्याचा प्रयत्न करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये अनुपमा गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर थेपले आणि ढोकळे विकत आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करताना दिसते. साधेपणातून उभा राहणारा हा प्रवास तिच्या आत्मविश्वासाची आणि नव्या उमेदेची झलक दाखवतो.या प्रोमोमध्ये अनुपमासोबत राहणाऱ्या एका छोट्या मुलीसोबत तिचे जिव्हाळ्याचे नातेही दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर मालिकेत आणखी एक महत्त्वाचा ट्विस्ट म्हणजे अभिनेता सचिन त्यागी यांची एन्ट्री होणार आहे. त्यांच्या भूमिकेमुळे अनुपमाच्या आयुष्यात नवे वळण येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी भागांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
मालिकेत अनुपमाची Anupamaa serial भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री रुपाली गांगुली यांनी या नव्या टप्प्याबद्दल प्रतिक्रिया देताना सांगितले की, “अनुपमा ही भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. आयुष्यात कितीही आव्हाने आली तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद या व्यक्तिरेखेत दिसते. अनेक महिलांच्या आयुष्यातील संघर्ष आणि अनुभव तिच्या प्रवासात प्रतिबिंबित होतात.”त्या पुढे म्हणाल्या, “प्रत्येक स्त्रीचा प्रवास वेगळा असतो. काहींना अनुपमाचा आधीचा प्रवास स्वतःसारखा वाटतो, तर काहींना पुढे येणारा टप्पा अधिक जवळचा भासतो. तिची जिद्द, स्वतःच्या किमतीची जाणीव आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची वृत्ती खरोखर प्रेरणादायी आहे.”
 
 
लीपनंतरच्या कथानकाबद्दल बोलताना रुपाली गांगुली यांनी सांगितले की, प्रार्थनाच्या मृत्यूनंतर कथा आता नव्या वळणावर आली आहे. सध्या अनुपमा गोव्यात देविकाच्या मुलीसोबत राहत असून ती नव्या जबाबदाऱ्यांना सामोरी जात आहे. त्याचबरोबर मालिकेत नवी व्यक्तिरेखा आणि काही अनपेक्षित घडामोडीही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.दरम्यान, लीपनंतर अनुपमाच्या आयुष्यात घडणाऱ्या या नव्या घडामोडींमुळे मालिकेच्या आगामी भागांकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे. गोव्यातील हा नवा अध्याय, सचिन त्यागींची भूमिका आणि अनुपमा पुन्हा एकदा स्वतःच्या बळावर आयुष्य उभे करताना दिसणार का, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे. आगामी भागांमध्ये भावना, संघर्ष आणि प्रेरणादायी क्षणांची मालिका पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे.
Powered By Sangraha 9.0