बहिणीला मॅसेज केल्याचा वाद; चाकू हल्ल्यात जखमी दुसऱ्या मुलाचाही मृत्यू

13 Mar 2026 14:09:19
अनिल कांबळे
नागपूर,
murder बहिणीला मॅसेज केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून 8 ते दहा जणांनी तीन युवकांवर चाकू हल्ला केला हाेता. या हल्ल्यात अरमान (वय 17, रा. कमसरी बाजार, कामठी) याचा जागीच मृत्यू झाला हाेता. तर दाेन मित्रही जखमी झाले हाेते. त्यातील गंभीर जखमी माेहित (वय 17, रा. कमसरी बाजार, कामठी) याचा 11 दिवसाच्या उपचारानंतर आज गुरुवारी सकाळी मेयाेमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच यश (वय 19) वर उपचार सुरू आहेत. ही घटना हाेळीच्या पूर्वसंध्येला नवीन कामठी परिसरातील कामठी पाेलीस चाैकीसमाेर घडली हाेती.
 

murder  
 
 
1 मार्च राेजी रात्री 8 वाजताच्या सुमारास मच्छीपूल-कादर झेंडा परिसरातील 8 ते 10 अज्ञात तरुणांनी अरमान व त्याच्या दाेन मित्रांना फोन करून ड्रॅगन पॅलेस परिसरात बाेलावले. तिघेही तेथे पाेहाेचताच ‘माझ्या बहिणीला मॅसेज का केले?’ या कारणावरून वाद सुरू झाला. वाद चिघळताच आराेपींनी चाकूने अरमानच्या पाेटावर तसेच डाेक्यावर सपासप वार केले. ताे रक्ताच्या थाराेळ्यात काेसळताच आराेपींनी मदतीला धावलेल्या माेहित आणि यशवरही हल्ला केला. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांनी अरमान शाैकत अली यास मृत घाेषित केले तर गंभीर जखमी माेहित दहाट यास पुढील उपचारासाठी मेयाे हाॅस्पिटल येथे हलविण्यात आले हाेते. त्याची प्रकृती चिंताजनक हाेती. मात्र आज गुरुवारी सकाळी त्याचाही मृत्यू झाला.
संतप्त नागरीकांचा रास्ता राेकाे
या घटनेतील पाचही अल्पवयीन आराेपींना ताब्यात घेत न्यायालयीन आदेशान्वये बाल सुधारगृहात हलविण्यात आले. मात्र, यातील काही आराेपी अजूनही अटकेबाहेर आहेत.murder या दुहेरी खून प्रकरणात पाेलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत इतर आराेपींना त्वरित अटक करून न्याय द्या या मागणीसाठी मरण पावलेल्या माेहितच्या मृतदेहासह नागरीकांनी कमसरी बाजार समाेरील कामठी महामार्गावर रस्ताराेकाे आंदाेलन केले. यामुळे वाहतूक ठप्प झाली हाेती.
तणावपूर्ण शांततेत अंत्यसंस्कार
पाेलिस अधिकारी अंकुश खेडकर, वरिष्ठ पाेलिस निरीक्षक महेश आंधळे यांनी संतप्त नागरिकांची समजूत काढली. गुन्ह्याचा याेग्य दिशेने तपास सुरू असून एकही आराेपी सुटणार नाही. या गुन्ह्यात जे आराेपी असतील त्या सर्वांना अटक करू, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर रास्ता राेकाे आंदाेलन थांबविण्यात आले. त्यानंतर माेहितच्या पार्थिवावर आजनी मार्गावरील माेक्षधाम येथे तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0