१५ मार्चपासून दत्तधाम नगरात भागवत कथा

13 Mar 2026 19:32:19
नागपूर,
Bhagavad Katha दत्तधाम नगर, बेसा पिपळा येथे प्यारेलाल राधेश्यामजी धारगे आणि समस्त धारगे परिवार यांच्या सौजन्याने १५ ते २२ मार्च दरम्यान श्रीमद्भ भागवत कथा व्यसनमुक्ती सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात राज्याचे महसूलमंत्री आणि नागपूरचे पालकमंत्रीचंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच उद्घाटन कीर्ती बडोले, नगराध्यक्ष बेसा पिपळा यांच्या शुभहस्ते होईल.
 
Bhagavad Katha
 
कर्मयोगी संत आणि व्यसनमुक्ती सम्राट, मधुकरराव खोडे उपाख्य (खराटे महाराज) यांच्या पावन उपस्थितीत नागपूर शहरात व्यसनमुक्तीबाबत विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये ग्रामसफाई, झोळीमध्ये व्यसनांची भिक्षा मागणे आणि दात्यांचे पाय धुणे यांचा समावेश आहे. Bhagavad Katha हे लक्षात घेता दहा वर्षानंतर खोडे महाराजांचं नागपूर शहरात आगमन होत आहे. भागवत कथांचा प्रारंभ रविवारी, १५ मार्चपासून सुरू होईल आणि २१ मार्चपर्यंत दुपारी २ ते ६:०० वाजता आयोजित राहील. २२ मार्च रोजी ह.भ.प. मधुकरराव खोडे (खराटे महाराज) यांचे काल्याचे कीर्तन सकाळी ११ ते दुपारी १ वाजता होईल. त्यानंतर दुपारी २:२० वाजतापासून महाप्रसाद वितरण सुरू होईल. आयोजकांनी सर्व नागरिक आणि भक्तांना या भागवत कथांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0