तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
bjp-honors-accomplished-women : आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टीच्यावतीने यवतमाळ शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. भाजपाच्या दत्त चौकातील जिल्हा कार्यालयात हा कार्यक्रम सोमवार, 9 मार्चला आयोजित करण्यात आला होता. याकरिता महिला शहराध्यक्ष डॉ. पुष्पलता सप्रे यांनी पुढाकार घेतला.
माजी मंत्री मदन येरावार यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी यवतमाळ नगर परिषद अध्यक्ष अॅड. प्रियदर्शनी उईके, शल्य चिकित्सक डॉ. जया घुले, अॅड. सविता मद्दीवार यांच्यासह प्रा. पुष्पमाला वानखडे या कर्तृत्ववान महिलांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास जिल्हा महामंत्री रेखा कोटेकर, महामंत्री राजू पडगिलवार, प्रदेश सरचिटणीस माया शेरे, शहराध्यक्ष नितीन गिरी, महिला आघाडी अध्यक्ष शैला मिर्झापुरे, जिल्हाध्यक्ष निर्मला विनकरे, शहराध्यक्ष लक्ष्मी सातपुते यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्व महिला पदाधिकाèयांचाही शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजपा शहराध्यक्ष तसेच पुष्पांजली समाज विकास संस्थेच्या अध्यक्ष डॉ. पुष्पलता सप्रे यांनी केले. यावेळी बोलताना त्यांनी महिलांनी निर्भीड, सुरक्षित व सक्षमपणे समाजाच्या हितासाठी पुढे यावे, असा संकल्प महिला दिनानिमित्त करण्याचे आवाहन केले. सूत्रसंचालन शैला सज्जनवार यांनी केले, तर आभार हर्षा कहारे यांनी मानले.
यशस्वितेसाठी माधुरी धायरा, दीपाली चंद्रे, चित्रा मुदेकर, शिल्पा सहारे, शुभदा हजारे, हिरा झिंगे, रेखा मगरे, गंगा सिडाम, शीला भवरे, प्रांजली राऊत, सविता सरगर, झलके, कंठाने यांच्यासह सर्व पदाधिकाèयांनी परिश्रम घेतले.