तभा वृत्तसेवा
माहूर,
shri-renukadevi-temple : महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेल्या माहूर गडावरील श्री रेणुकादेवी मंदिर येथे असलेल्या दानपेट्यांची मोजणी बुधवार, 11 मार्च 2026 रोजी करण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष व सचिव यांच्या आदेशानुसार तहसीलदार तथा संस्थानचे कोषाध्यक्ष अभिजित जगताप, विश्वस्त चंद्रकांत भोपी, विश्वस्त संजय काण्णव, विश्वस्त अरविंद देव, विश्वस्त बालाजी जगत, विश्वस्त दुर्गादास भोपी, व्यवस्थापक विजय राऊत, योगेश साबळे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली.
11 फेब्रुवारी 2026 रोजी सीलबंद करण्यात आलेल्या एकूण 11 दानपेट्या उघडण्यात आल्या. यामध्ये सभामंडपातील 4, महालक्ष्मी माता मंदिरातील 1, तुळजाभवानी माता मंदिरातील 1, मंदिर परिसरातील 2 आणि परशुराम मंदिरातील 3 दानपेट्यांचा समावेश होता.
सर्व दानपेट्या उघडून त्यातील रक्कम, सोन्याचांदीच्या वस्तूंची तपासणी संस्थानचे अधिकृत सोनार सुशील टाक यांनी केली. दानपेट्यांमधून 500, 200, 100, 50, 20, 10 व 5 रुपयांच्या नोटा मोठ्या प्रमाणात आढळल्या. दानपेट्यांमधून मिळालेली एकूण रक्कम 17 लाख 87 हजार 758 रुपये आहे.
तसेच भक्तांनी अर्पण केलेल्या पिवळ्या धातूचे (सोन्याचे) सुमारे 61 ग्रॅम 900 मिली वजनाचे दागिने व नथ 20 नग, तर पांढèया धातूचे (चांदीचे) 1 किलो 129 ग्रॅम 300 मिली वजनाचे विविध वस्तू दानपेटीतून आढळून आले. याशिवाय पांढèया धातूचे परशुराम पाळणे वजन 821.200 ग्रॅम आहेत.
याशिवाय संस्थानच्या विविध माध्यमांतून प्राप्त झालेल्या देणग्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. 11 फेब्रुवारी 2026 ते 10 मार्च 2026 या कालावधीत मंदिरास देणगी विभागातून 20 लाख 20 हजार 991 रुपये, साडी-पातळ विक्रीतून 16 लाख 88 हजार 769 रुपये, तर ऑनलाइन देणग्यांद्वारे 13 लाख 81 हजार 910 रुपये इतकी रक्कम प्राप्त झाली आहे.
तसेच पावतीप्रमाणे मिळालेल्या पिवळ्या व पांढèया धातूंची स्वतंत्र नोंद करण्यात आली. त्यामध्ये पिवळ्या धातूचे 3 ग्रॅम 480 मिली वजन, तर पांढèया धातूचे 1 किलो 379 ग्रॅम 650 मिली वजन नोंदविण्यात आले.
गेल्या एक महिन्यात श्री रेणुका देवी संस्थानला सर्व बाजूंनी मिळालेले एकत्रित उत्पन्न 68 लाख 79 हजार 428 रुपये आहे. वास्तविक पाहता फेब्रुवारी, मार्च हे परीक्षा व कामाच्या व्यस्ततेचे महिने म्हणून पाहिले जातात. असे असतानाही भाविकांनी मातेच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केले हे विशेष.
मंदिर प्रशासनाने सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडल्याची माहिती संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजित जगताप यांनी दिली आहे.