घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी विभागात धडक कारवाई

१६३ गॅस वितरकांची तपासणी, ११० सिलेंडर जप्त, ५ गुन्हे दाखल

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
नागपूर, 
domestic-gas-black-market : घरगुती गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर असलेला काळा बाजार रोखण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांतील १६३ गॅस वितरकांची तपासणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली असून, ११० सिलेंडर जप्त करण्यात आले असल्याची माहिती विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी आज दिली.
 
 
k
 
मध्य पूर्व आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टंचाई संदर्भात सुरू असलेल्या अफवा तसेच सिलेंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रसासनातर्फे धडक मोहीम हाती घेण्यात आाली आहे. नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहीम जिल्हाधिकारी संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांकडून प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आज राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये विभागातील १६३ गॅस वितरकांची तसेच गॅस गोडाऊनची तपासणी करण्यात आली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात वितरकांची तपासणी करण्यात आली असून, तसेच भंडारा जिल्ह्यात ३७, गोंदिया १७, नागपूर जिल्हा पुरवठा अधिकारी १९, अन्न धान्य वितरण अधिकारी ३, वर्धा १५, तर चंद्रपूर २ ठिकाणी आकस्मिक धाडी टाकण्यात आल्या. यामध्ये ११० गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून, १ लाख ७ हजार ९२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे.
 
 
या धडक कारवाईमध्ये ५ गुन्ह्यांची नोंद करणयात आली असून, एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील २, गोंदिया जिल्ह्यातील १, तर नागपूर जिल्हा कार्यालयाकडून २ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विभागीय पुरवठा आयुक्त अनिल बंसोड यांनी दिली.
 
अफवांवर विश्वास ठेवू नका
 
 
विभागात गॅस पेट्रोल व ड़िझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त विजायलक्ष्मी बिदरी यांनी केले आहे. विभागातील जिल्हाधिकारी जिल्हा प्रशासन, पोलिस प्रशासन तसेच ऑइल कंपन्या मिळून जिल्ह्यातील पेट्रोल व डिझेल साठा कायम राहील याबद्दल प्रशासना कडून खरारदारी घेत असल्याचे यावेळी सांगितले.