वर्धा,
Expired medicines wardha शहरात निष्पाप प्राण्यांबद्दल दुर्लक्ष होत आहे. शहरातील एकाच ठिकाणी थोक भावात औषधे मिळण्याचे ठिकाण असलेल्या दावा मार्केट मेडिकल कॉम्प्लेसजवळील उघड्या कचर्यात कालबाह्य औषधे टाकली जात आहेत. येथे सकाळपासुन जनावरं फिरत असतात. येथे प्लास्टिकही पडून असते त्यातच आता कालबाह्य औषधं टाकून दिले जात असल्याने त्याचा जनावरांच्या प्रकृतीवर दीर्घ कालीन परिणाम होत आहेत. प्लॉस्टिक आणि स्वच्छतेबाबत शहरात जनजागृती करूनही फायदा होत नसल्याचे दिसुन येत आहे.कचर्यात औषधं टाकणार्या विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी गो रक्षा हिंदू दलाच्या वतीने करण्यात आली आहे.
वर्धा येथील दावा मार्केट Expired medicines wardha कॉम्प्लेसमधील सरकारी शौचालयाजवळ ही जागा आहे. येथे टाकण्यात येणारा कचरा सामान्य नागरिकांचा नसून जवळच्या वैद्यकीय व्यावसायिकांनी टाकलेल्या कालबाह्य औषधांचा असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले. यात सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे, गायी, बैल आणि इतर प्राणी कचर्यात पडलेल्या या कालबाह्य औषधांचे सेवन करत आहेत, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत. शहरात दररोज भटके प्राणी आजारी पडत आणि मरताना दिसतात. बर्याचदा, रस्त्यावर मृत आढळलेल्या प्राण्यांचे वैद्यकीय शवविच्छेदन केले जात नसल्याने या प्राण्यांच्या मृत्यूचे खरे कारण पुढे येत नाही. तथापि, कचर्यात फेकलेली कालबाह्य औषधे देखील त्यांच्या मृत्यूचे एक प्रमुख कारण असू शकतात.
औषध बाजाराभोवती कालबाह्य औषधे फेकणे बंद करावे, दोषी वैद्यकीय व्यावसायिकांवर कठोर कारवाई करावी. शहरातील मोकाट प्राण्यांच्या संरक्षणासाठी योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी गो रक्षा हिंदू दल जिल्हााध्यक्ष किशोर सोनी यांनी केली आहे.