देवरीच्या जरताळटोल्यात आगीचे तांडव

13 Mar 2026 15:09:18
गोंदिया, 
fire breaks out देवरी तालुक्यातील मुरदोली ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या जरताळटोला येथे रात्रीच्या सुमारास एका शेतकर्‍याच्या घराला आग लागल्याने संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना गुरुवारी १२ मार्च रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र, शेतकर्‍यांचे अन्न धान्य, कपड्यांसह घरातील संपूर्ण जीवनोपयोगी साहित्य जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. विनोद सखाराम खांडवाई असे त्या पिडीत शेतकर्‍याचे नाव असून संपूर्ण घर व साहित्य जळाल्याने सदर शेतकर्‍याचे कुटूंब उघड्यावर आले आहे.
 

fire breaks out 
 
 
विनोद खांडवाई यांचे अकरा जणाचे कुटूंब असून घटनेच्या वेळी सर्वजण घरीच हजर होते. त्यातच रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने काही क्षणातच संपूर्ण घर जळून राख झाले. गावकर्‍यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. आगीत संपूर्ण घर आणि घरातील अन्नधान्य, कपडे आणि गृहोपयोगी साहित्य जळून राख झाल्याने खांडवाये कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. सदर कुटुंब शेतमजुरीवर अवलंबून असून या आगीमध्ये शेतीपयोगी साहित्यही जळून खाक झाले.fire breaks out घटनेची माहिती स्थानिक तलाठी व तहसील कार्यालयाला देण्यात आली असून नुकसानीच्या पंचनामा करून शासनाने खांडवायी कुटुंबाला तातडीने मदत करावी, अशी मागणी गावकर्‍यांकडून होत आहे.
Powered By Sangraha 9.0