लग्नानंतर सुनेनं सासू-सासऱ्यांचा सांभाळ न केल्यास ’गुन्हा’ ठरतो का?

13 Mar 2026 14:11:23
मुंबई 
High Court आपल्या भारतामध्ये लग्न हा विशेष समारंभ मानला जातो.मुलगा मुलगी लग्नानंतर आपल्या नवीन जीवनाला सुरुवात करतात. यामुळे दोन कुटुंबही एकमेकांना जोडली जातात. दुसरीकडे सासरी आलेल्या सुनेकडून अनेक अपेक्षा बाळगल्या जातात. मात्र त्यामुळे अनेक महिलांना वैयक्तिक आयुष्यात तडजोडी कराव्या लागतात. कदाचित याच कारणामुळे आजकाल काही दांपत्ये लग्नानंतर स्वतंत्रपणे राहण्याचा पर्याय निवडताना दिसतात. मात्र या संदर्भात न्यायालयाने एक महत्वाचं निरीक्षण नोंदवले आहे. अलाहाबाद हायकोर्टाने घटस्फोटाशी संबंधित एका प्रकरणाची सुनावणी करताना स्पष्ट केले की, सुनेने आपल्या वृद्ध सासू-सासऱ्यांची काळजी न घेणे ही कृती क्रूरता किंवा कायदेशीर गुन्हा ठरत नाही.
 

mumbai hc
 
न्यायालय पुढे म्हणाले की, कुटुंबातील अशा प्रकारच्या बाबी अत्यंत वैयक्तिक स्वरूपाच्या असतात. त्यामुळे प्रत्येक कुटुंबातील नातेसंबंध आणि परिस्थिती यांचे सविस्तर परीक्षण करणे न्यायालयासाठी शक्य नसते. पती घराबाहेर असताना पत्नीने केवळ त्याच्या आई-वडिलांची काळजी घेतली नाही, या कारणावरून तिला ङ्कक्रूरतेङ्खचा आरोप लावता येत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.
पत्नीचे वैवाहिक कर्तव्य काय?
High Courtन्यायालयाच्या निरीक्षणानुसार सासू-सासऱ्यांची काळजी घेणे ही पत्नीची कायदेशीर जबाबदारी नाही. पत्नीचे प्राथमिक वैवाहिक कर्तव्य हे तिच्या पती आणि मुलांप्रती असते. सामाजिक आणि सांस्कृतिक अपेक्षा वेगळ्या असू शकतात, मात्र त्या नेहमीच कायदेशीर जबाबदाऱ्यांशी जुळतातच असे नाही, असेही न्यायालयाने सांगितले.
मग पालकांची जबाबदारी कोणावर?
High Court न्यायालयाने यावेळी Charalpinshparapalsha Rpava Thassrasharishesh Jharishpi Rpava Daspali Ulinlushpi Ali, 2007. चा संदर्भ दिला. या कायद्यानुसार मुलावर आपल्या आई-वडिलांची काळजी घेण्याची जबाबदारी असते. त्यामुळे वृद्ध पालकांची देखभाल करण्याची प्राथमिक जबाबदारी मुलावरच असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
न्यायालयाने यासंदर्भात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा स्पष्ट केला. सून संयुक्त कुटुंबाचा भाग असली तरी सासरच्या मालमत्तेवर तिचा थेट कायदेशीर अधिकार नसतो. पत्नीचे अधिकार प्रामुख्याने तिच्या पतीने स्वतः कमावलेल्या मालमत्तेपुरते मर्यादित असतात.
Powered By Sangraha 9.0