बहिणींनो १५०० रुपये येणार नाही?

५०–६० लाख महिला अपात्र ठरू शकतात

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
मुंबई
Maharashtra Ladki Bahin Yojana महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू आहे. या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या महिलांना दरमहा १५०० रुपये लाभ मिळतो. योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला असून, कोट्यवधी महिलांनी याचा लाभ घेतला आहे. मात्र काही काळापूर्वी योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांवर नजर टाकण्यात आली आणि अनेक महिलांनी फसवणूक करून निधी घेतल्याचे उघड झाले.
 

Maharashtra Ladki Bahin Yojana 
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने निवडणुकीनंतर निकषांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया अनिवार्य केली. आधी ही तारीख डिसेंबर २०२५ पर्यंत निश्चित करण्यात आली होती; नंतर ती वाढवून ३१ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आली.सरकारकडून स्पष्ट केले गेले आहे की, या ई-केवायसी प्रक्रियेत चुकीमुळे अनेक महिलांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे ऑनलाइन पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना ३१ मार्च २०२६ पर्यंत दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.सरकारने आवाहन केले आहे की, ज्यांच्या ई-केवायसीत काही चूक आहे, त्यांनी ही दुरुस्ती वेळेत करून घ्यावी. या प्रक्रियेनंतरच पात्रतेची पडताळणी पूर्ण होईल. जर कोणतीही महिला निकषात बसली नाही, तर तिचे नाव योजनेतून वगळले जाईल आणि दरमहा मिळणारे १५०० रुपये थांबवले जातील. अंदाजानुसार सुमारे ५० ते ६० लाख महिला या निकषात बसणार नाहीत आणि त्या अपात्र Maharashtra Ladki Bahin Yojana ठरू शकतात.याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करत स्पष्ट केले की, लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे. योजनेसाठी राज्य सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात ३६ हजार कोटींची तरतूद केली आहे, ज्यामुळे राज्यातील कोट्यवधी लाभार्थी महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.