मिशन आयएएसने केला युपीएससी उत्तीर्ण प्रज्वलचा सन्मान

13 Mar 2026 19:32:12
कारंजा (घा.),
prajwal-nasre : मिशन आयएएसचे संचालक डॉ. प्रा. नरेशचंद्र काठोळे, नागपूर विभागीय संचालक विलास वानखडे, प्रा. सतीश काळे यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या ठाणेगाव येथील प्रज्वल नासरेचा पुष्पगुच्छ, शाल, ग्रामगीता व सन्मानपत्र देऊन सन्मान केला. यावेळी प्रज्वलचे आईवडील यांना सुद्धा सन्मानित करण्यात आले.लोककवी सुरेश मलवे यांनी यावेळी आई आणि माणुसकी ही दोन गीते सादर केली.
 
 
fff
 
 
 
तालुयातील ठाणेगाव येथील प्रज्वल नासरे याने नुकत्याच जाहीर झालेल्या युपीएससी परीक्षेच्या निकालात भारतातून ६७७ वा रैंक घेत कारंजा तालुयाच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे. ग्रामीण भागात राहत असलेल्या व घरची सामान्य परिस्थिती असलेल्या प्रज्वलने या परीक्षेकरिता कुठेही कोचिंग लावले नाही, घरी राहून ऑनलाईन कोचिंग करून सतत अभ्यास करून त्याने हे यश मिळविले आहे. डॉटर होण्याची इच्छा मनाशी बाळगून त्याने नीट परीक्षेची तयारी केली परीक्षा देखील उत्तीर्ण केली. पण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फ्री सीटवर प्रवेश मिळण्यासाठी आवश्यक गुण त्याला मिळू शकले नाही. या अपयशाने खचून न जाता त्याने नव्या ध्येयाने वाटचाल सुरूच ठेवली. भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अविरत प्रयत्न सुरू ठेवले होते.
Powered By Sangraha 9.0