नागपुरातील कुटुंबाच्या कारला राजस्थानमध्ये अपघात : तिघांचा मृत्यू, सहा जण जखमी

13 Mar 2026 14:03:02
अनिल कांबळे
नागपूर,
car accident राजस्थान येथील खाटू श्याम बाबा दर्शनासाठी गेलेल्या कामठी येथील पारसे परिवारातील तिघांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. या भीषण अपघातात कुटुंबातील आणखी सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी राजस्थानमधील सालासार रोडवर झाला.
 

car accident 
 
 
कामठी-कचरीपुरा गणपतराव वस्ताद आखाडा परिसर कामठी येथील महादेव ऋषी पारसे यांच्या परिवारातील ९ सदस्य राजस्थान येथील खाटू श्याम बाबा मंदिरात देवदर्शनासाठी जात होते. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सालासर रोड मार्गावर त्यांच्या तवेरा गाडीला पिकप वाहनाने जबर धडक दिली. यात आई -वडील – मुलगा तिघे जण दगावले. तर इतर सहा गंभीर जखमी झाले.
प्राप्त प्राथमिक माहितीनुसार कचरीपुरा येथील महादेव ऋषी पारसे (५२) हे ६ मार्चला घराशेजारी राहणारे मनोज चिंदमवार यांच्या मालकीची तवेरा गाडी घेऊन पत्नी कांता पारसे (४५), मुलगा घनश्याम (२२), पुतणी आराधना चंद्रभान पारसे (२६), पायल शंकर पारसे (२२) ,पल्लवी चंद्रभान पारसे (२१) ,पुनम यादव पारसे (२०) ,तुषार महादेव पारसे (२४) ,पवन बागडे (२२) हे सर्व मध्यरात्री बाराच्या सुमारास कामठी येथून उज्जैनला महाकालेश्वर दर्शनाला निघाले. दर्शन घेऊन ते ११ मार्चला राजस्थान रिगंस येथील खाटू श्याम बाबा मंदिराकडे जात असताना जयपुर मार्गावर सालासर परिसरात विरुद्ध दिशेने येणाऱ्या पिकप वाहनाने जबर धडक दिली.
यात महादेव पारसे त्यांची पत्नी कांता, मुलगा घनश्याम हे तिघेही गंभीर जखमी झाले त्यांच्यासह गाडीतील चालक मनोज चिदुंमवार, आराधना, पायल पारसे, पल्लवी, पुनम, तुषार, पवन हे सर्व गंभीर जखमी झाले. सर्वांना ताबडतोब सालासर येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून महादेव पारसे, त्यांची पत्नी कांता मुलगा घनश्याम या तिघांना मृत घोषित केले. उर्वरित सर्व गंभीर जखमी असून उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.car accident अपघाताची माहिती कामठी येथे रात्री आठच्या सुमारास पसरताच आप्तांनी त्यांच्याघराकडे धाव घेतली. त्यांचे भाऊ गुलाब ऋषी पारसे यांनी माहिती घेतली. सुरादेवी कोराडी येथील सुनील दूधपचारे त्वरित सालासरला निघाले. गुरुवारी दुपारी हे सर्वजण तिथे पोहोचले. त्यांनी महादेव , कांता आणि घनश्याम पारसे यांच्या मृत्यूची माहिती दिली. तिघांचेही मृतदेह लवकरच कामठी येथे घरी आणण्यात येणार आहेत. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे कामठी येथे आणण्यात येणार असल्याचे नातेवाईक गुलाब पारसे यांनी सांगितले. खाटू श्याम देव दर्शनाला गेलेल्यांवर काळाने अशी झडप घातल्याने कचरीपुरात शोककळा पसरली आहे.
Powered By Sangraha 9.0