नागपूर,
nagpur-sharjah-flight-service-resumes : मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळेमध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे सुमारे गत १३ दिवसांपासून बंद असलेली एअर अरेबियाची शारजाह-नागपूर विमानसेवा गुरुवारी रात्री उशिरा पुन्हा सुरू झाली. एअर अरेबियाची विमानसेवा जी ९४१५ गुरुवारी रात्री १२.२० वाजता शारजाहहून उड्डाण घेऊन पहाटे ३.४० नागपूर विमानतळावर उतरले. परतीची विमानसेवा जी ९४१६ पहाटे ४.२० वाजता नागपूरहून निघाली आणि सकाळी ६.५५ वाजता शारजाहला पोहोचली. मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या तणावामुळे २८ फेब्रुवारीपासून ही विमानसेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात अनेक पर्यटक व इतर प्रवासी आखाती देशांमध्ये अडकले होते. ही सेवा पुन्हा सुरू झाल्याने प्रवाशांनी दिलासा केला आहे. नागपूर विमानतळावरुन दोन आंतरराष्ट्रीय उड्डाणे आहेत. यात कतार एअरवेजची दोहा-नागपूर विमानसेवा देखील लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे.