तभा वृत्तसेवा
नेर,
pandit-deendayal-upadhyaya-training-mahabhiyan : भारतीय जनता पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक बळकटीसाठी नेर येथे ‘पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर 14 व 15 मार्च रोजी दुपारी 12 ते 4 या वेळेत भारतीय जनता पार्टी कार्यालयात पार पडणार आहे.
या शिबिरात कार्यकर्त्यांना महाराष्ट्र शासनाने राबविलेल्या विविध लोकोपयोगी योजना व विकासकामांची माहिती देण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारच्या विकसित व आत्मनिर्भर भारत संकल्पनेसाठी राबविण्यात येणाèया योजनांचा आढावा घेण्यात येईल.
भारत राष्ट्र पुनर्निर्माणात भारतीय जनता पार्टीचे योगदान, समाजमाध्यमे व कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा योग्य वापर, कार्यकर्ता विकास व दायित्व, निवडणूक व्यवस्थापन, देशासमोरील आव्हाने आणि विरोधकांच्या फेक नॅरेटिव्हबद्दल मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा एकात्म मानवतावाद व सांस्कृतिक राष्ट्रवाद या विचारधारेची माहिती देत भाजपाच्या कार्यपद्धती व कार्यविस्ताराचा ‘रोडमॅप’ कार्यकर्त्यांसमोर मांडला जाणार आहे. या शिबिराचे प्रभारी म्हणून सुभाष काटेकर कार्य पाहणार आहेत.
या प्रशिक्षण शिबिरासाठी बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, मंडळ पदाधिकारी, विविध आघाडी पदाधिकारी तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन नेर तालुक्याचे भाजपा तालुका अध्यक्ष निलेश राठोड यांनी केले आहे.