आता आयटी क्षेत्रातही ‘गॅस’ संकट

13 Mar 2026 16:26:10
चेन्नई
IT secto सध्या देशभरात गॅस टंचाई निर्माण झाली असून याचा फटका उद्योगधंद्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत साऱ्यनाच बसतो आहे. गेल्या काही वर्षात तांत्रिक बिघाड किंवा खराब हवामानामुळे कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम दिल्याचे आपण ऐकले आहे. मात्र, आता चक्क स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा आयटी क्षेत्रातील कामाच्या स्वरूपावर परिणाम करू लागला आहे. व्यावसायिक एलपीजीच्या तुटवड्यामुळे चेन्नईतील दिग्गज आयटी कंपनी एचसीएल टेकने कर्मचाèयांना घरूनच काम करण्यास सांगितले आहे.
चेन्नईतील एचसीएल टेकच्या कॅम्पसमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. कॅन्टीन चालविण्यासाठी आवश्यक इंधन पुरवठा होत नसल्याने कर्मचाèयांच्या भोजनाची सोय करणे कठीण झाले आहे. यावर उपाय म्हणून कंपनीने गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवसांसाठी कर्मचाèयांना ‘वर्क फ्रॉम होम’ देण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल सध्या फक्त चेन्नईपुरताच मर्यादित असून देशातील इतर कार्यालयांचे कामकाज नियमित सुरू आहे.
 
work from home 
इतर मोठ्या कंपन्यांनाही झळ
IT secto इन्फोसिस : बंगळुरू, पुणे आणि चेन्नईतील डिलिव्हरी सेंटर्सवर फूड कोर्टच्या सेवा मर्यादित झाल्या आहते. पुढील आदेशापर्यंत लाईव्ह काऊंटर बंद ठेवण्यात आले आहेत.
एचटीसी ग्लोबल सर्व्हिसेस : चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबादेतील कार्यालयात कॅन्टीन पूर्णपणे बंद करून कर्मचाèयांना केवळ पाकिटबंद पदार्थांवर अवलंबून राहावे लागत आहे.
टीसीएस : सध्या येथील कॅन्टीन सेवा सुरळीत आहे. मात्र, लवकरच कॅन्टीनबाबत काहीतरी ठोस निर्णय होतींल, असे संकेत मिळत आहेत.
कॉर्पोरेट कॅन्टीनमधील मेन्यू गायब
IT sectoकॉर्पोरेट कॅन्टीन चालवणाèया एजन्सीच्या मेन्यूमध्येही मोठे बदल झाले आहेत. गॅसची बचत करण्याच्या दृष्टीने मेन्यूमध्ये बदल केले आहेत. ज्या पदार्थांना शिजविण्यासाठी जास्त वेळ आणि गॅस लागतो, ते मेन्यूमधून हटवण्यात आले आहेत. एलपीजीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आता कंपन्या मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक कुकिंग उपकरणांचा वापर करत आहेत.
Powered By Sangraha 9.0