९.३२ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १८,६४० कोटी रुपये जमा होणार

13 Mar 2026 17:33:47
मुंबई
PM Kisan 22nd installment release देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. पंतप्रधान मोदी आज गुवाहाटी येथून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता जाहीर करणार आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान नवी दिल्ली येथे पत्रकार परिषदेत दिली.
 

PM Kisan 22nd installment release 
या कार्यक्रमादरम्यान देशातील सुमारे ९ कोटी ३२ लाख पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे १८ हजार ६४० कोटी रुपयांची रक्कम जमा केली जाणार आहे. या योजनेमुळे देशभरातील शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळत असल्याचे केंद्र सरकारचे म्हणणे आहे.
मंत्री चौहान यांनी सांगितले की, PM Kisan 22nd installment release या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना ४ लाख ९ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक आर्थिक मदत देण्यात आली आहे. आजचा हप्ता जमा झाल्यानंतर ही एकूण रक्कम ४ लाख २७ हजार कोटी रुपयांच्या पुढे जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, गेल्या दशकात देशातील कृषी क्षेत्रात लक्षणीय प्रगती झाल्याचा दावा देखील सरकारकडून करण्यात आला आहे. २०१४ साली देशातील एकूण कृषी उत्पादन सुमारे २५२ दशलक्ष टन होते, ते २०२५ मध्ये वाढून ३५७ दशलक्ष टनांपर्यंत पोहोचले आहे. तसेच फलोत्पादन क्षेत्रातही मोठी वाढ झाली असून उत्पादन २७७ दशलक्ष टनांवरून ३६९ दशलक्ष टनांपर्यंत वाढल्याचे चौहान यांनी सांगितले. फळे आणि भाजीपाला उत्पादनात सातत्याने वाढ होत असल्याने कृषी क्षेत्राला मोठा हातभार लागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा हप्ता खात्यात जमा झाला आहे की नाही हे ऑनलाइन तपासता येणार आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर नोंदणी क्रमांक किंवा आधार क्रमांक टाकून, कॅप्चा भरल्यानंतर मोबाईलवर आलेल्या ओटीपीद्वारे पडताळणी केल्यास हप्ता जमा झाल्याची माहिती मिळू शकते.
Powered By Sangraha 9.0