दहावीच्या पेपर टेलिग्रामवर... ठेवली एवढ्या रुपयाची रक्कम

    दिनांक :13-Mar-2026
Total Views |
पुणे
Pune exam paper leak scam राज्यभरात सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असून या परीक्षा कॉपीमुक्त पार पडाव्यात यासाठी राज्य शिक्षण मंडळाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, तरीही काही ठिकाणी गैरप्रकार उघडकीस येत आहेत. अशातच पुण्यात पेपरफुटीच्या नावाखाली विद्यार्थ्यांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून गणिताचा पेपर असल्याचा बनाव करून शेकडो विद्यार्थ्यांकडून पैसे उकळणाऱ्या मुख्य सूत्रधाराला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. चैतन्य शेंडे (रा. चंद्रपूर) असे अटकेत घेतलेल्या आरोपीचे नाव असून तो स्वतः नर्सिंगचा विद्यार्थी असल्याचे समोर आले आहे.
 

Pune exam paper leak scam 
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चैतन्य शेंडे याने टेलिग्रामवर एक गट तयार केला होता. या गटात सुमारे २४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. आगामी गणिताचा पेपर आपल्याकडे असल्याचा दावा करत तो या विद्यार्थ्यांशी संपर्क साधत होता. संबंधित पेपर मिळवून देण्यासाठी त्याने प्रत्येकी ६०० रुपयांची मागणी केली होती. विद्यार्थ्यांचा विश्वास संपादन करून तो ऑनलाईन पद्धतीने पैसे स्वीकारत असे.
मात्र, पैसे मिळताच तो Pune exam paper leak scam  विद्यार्थ्यांना पेपर न देता त्यांना ग्रुपमधून आणि वैयक्तिक चॅटमधून तात्काळ ब्लॉक करत असल्याचे तपासात उघड झाले आहे. परीक्षेच्या तणावात असलेल्या विद्यार्थ्यांनी पेपर मिळेल या आशेने पैसे भरले, मात्र त्यांची आर्थिक फसवणूक झाली. अशा प्रकारे त्याने अनेक विद्यार्थ्यांना गंडा घातल्याचे पोलिसांनी सांगितले.या प्रकरणातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे आरोपी चैतन्य शेंडे हा स्वतः नर्सिंगच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या विद्यार्थ्याने असा गुन्हेगारी मार्ग का निवडला, याबाबत पोलीस अधिक चौकशी करत आहेत. या प्रकरणात त्याला इतर कोणाची मदत मिळाली का, तसेच इतर विषयांच्या पेपरफुटीच्या नावाखालीही अशाच प्रकारे फसवणूक करण्यात आली आहे का, याचाही तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.