दिव्य ज्योत आणण्यासाठी डोंगरगावातील रामभक्त अयोध्येला रवाना

13 Mar 2026 17:48:28
आरमोरी,
Ram Navami festival, तालुक्यातील डोंगरगाव (भु.) येथे रामनवमीच्या निमित्ताने श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे औचित्य साधून डोंगरगाव येथील रामभक्त राम लल्लाच्या अयोध्या या ठिकाणी जाऊन दिव्य ज्योत 18 मार्च रोजी डोंगरगाव या ठिकाणी भागवत सप्ताहाच्या मंचावर आणणार आहेत. यासाठी रामभक्त 12 मार्च रोजी अयोध्या येथे निघाले आहेत.
 

Ram Navami festival, 
ही दिव्य ज्योत आणण्यासाठी डोंगरगाव येथील रामभक्त संतोष सेलोटे, हरिचंद्र राऊत, सौरभ शस्त्रकार, अमोल ठाकरे, गुरुदेव वाघमारे, खुशाल ढोरे, अनिल नैताम, लोचन ढोरे, नितेश धोटे, मुरलीधर खरकाटे निघालेले आहेतहनुमान मंदिराच्या भव्य पटांगणात 18 ते 26 मार्चपर्यंत श्रीमद् भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रामनवमीच्या निमित्ताने घटस्थापना हरिभक्त परायण बाळकृष्ण तलमले महाराज यांच्या हस्ते होणार असून, त्या दरम्यान ध्यानपाट, पूजा, रामधून पालखी प्रार्थना व हरिपाठ भजन कार्यक्रम, रात्री श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 26 मार्चला राम मंदिर देवस्थान डोंगरी येथे भव्य जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी गोपालकाला व महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक मान्यवर मंडळीचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये शिक्षण महर्षी भाग्यवान खोब्रागडे, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव कीरसान, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, उद्योगपती भोलू सोमनानी, नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार, माजी आमदार कृष्णा गजबे, माजी आमदार रामकृष्ण मडावी, माजी आमदार नामदेव उसेंडी, माजी आमदार देवराव होळी, शासकीय कंत्राटदार नेताजी गुलकवार, माजी नगराध्यक्ष किसन नागदेवे, सेवानिवृत्त पीएसआय (चंद्रपूर) घनश्याम झुरे, मुख्याध्यापक सुनील चरडुके, नरेंद्र उंदीरवाडे गुरुजी, माजी उपसरपंच कवडू सहारे, डॉ. नितीन कोडवते, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अ‍ॅड. प्रणोती निंबोरकर, आरमोरीचे नगराध्यक्ष रुपेश पुणेकर, ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, रामायण रेस्टॉरंट गडचिरोलीचे पवन सूचक, महाराष्ट्र पोलिस वामन ठाकरे, माजी जिप सदस्य भाग्यवान टेकाम, गजपुरे, सहकारी बँक मुंबईचे सदस्य प्रमोद पिपरे, मनोरभाई शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मनोज वनमाळी, वाघाये शिक्षण संस्थेचे सचिव महेश तितरमारे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, सदानंद कुथे आदींचा समावेश आहे.
Powered By Sangraha 9.0