मानोरा,
Taluka Agriculture तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये मंजूर संख्येपैकी ४० टक्के अधिकारी कर्मचार्यांची पदे रिक्त असल्यामुळे त्याचा भुर्दंड नेमणुकीला असलेल्या अधिकारी कर्मचार्यांसह शेतकर्यांना भोगाव लागत असल्याच्या विरोधात शिवसेना तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शासनाच्या बेजाबाबदार धोरणाचा आज, १३ मार्च रोजी अभिनव आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला.
तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील रिक्त पदांमुळे कृषी विभागाच्या कल्याणकारी योजनांची माहिती शेतकर्यांना मिळत नाही ज्यामुळे शेतकर्यांना खरीप रब्बी व उन्हाळी हंगामामध्ये नुकसान सहन करावे लागते. ५० पैकी केवळ २९ कर्मचारी नेमणुकीला असल्यामुळे रिक्त पदाचा ताण अधिकारी व कर्मचार्यांवर येत असल्यामुळे शासनाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील रिक्त पदांचा तातडीने भरणा करण्यात येणे संदर्भात शिवसेना उभा ठाकरे लोकशाही मार्गाने पाठपुरावा सुरू आहे ज्याची दखल घेण्यात येत असल्यामुळे तालुका अध्यक्ष रवींद्र पवार यांच्या नेतृत्वात तालुका संघटक बाळू राठोड, संतोष पुरी शहर प्रमुख, शिवा अंधारे युवा सेनाप्रमुख, सुभाष गोंधळेकर उपतालुकाप्रमुख, किशोर पाटील, विकास ठाकरे, गणेश राजगुरे, संतोष भुसारी ,शंकर सोनटक्के, विजय चौधरी,Taluka Agriculture हरीश तिकडे, जगदेवराव मासोतकर, भीमराव राठोड, राजू उंबरकर या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या द्वारे तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांच्या खुर्चीला हार घालून शासनाचा निषेध करण्यात आला.