नागपूर,
The Rock Riders Association द रॉक रायडर्स असोसिएशन, नागपूर यांच्या वतीने महिला सशक्तीकरण, ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत नागपूर ते शेगाव अशी सायकल वारी १४ ते १६ मार्च २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आली. वारीसाठी निघालेल्या सर्व सायकलस्वारांना महाराष्ट्राचे विद्यमान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पश्चिम नागपूर विधानसभेचे नेते सुधाकर कोहळे, विकास ठाकरे, प्रतिभा पाटील, रामनगरचे नगरसेवक योगेश पाचपोर, तसेच सरमुकादम सर आणि टेकाडे सर यांनी शुभेच्छा दिल्या.
फिटनेस व आरोग्याबाबत प्रेरणादायी आयरनमॅन डॉ. राजेंद्र जयस्वाल यांनीही सहभागी सायकलस्वारांना शुभेच्छा दिल्या. या वारीसाठी सुयोग सायकल स्टोअरचे संस्थापक राजारामजी डोणारकर यांचा मोलाचा सहयोग लाभला. याशिवाय पार्थ फाउंडेशन, नागपूर तर्फे सर्व सायकलिस्टना इमर्जन्सी फर्स्ट एड बॉक्सचे वितरण करण्यात आले. The Rock Riders Association वारी यशस्वी करण्यासाठी संगीत चव्हाण आणि प्रशांत चव्हाण यांनी आर्थिक सहाय्य व सहकार्य केले तसेच शुभेच्छा दिल्या. शेगाव येथे सर्व सायकलस्वारांच्या राहण्याची व्यवस्था राजेश धांडे यांनी केली.
वारीमध्ये सहभागी सायकलस्वारांमध्ये साधना पापडकर, संजय धरमठोक, सुनिल दिकोंडवार, योगिता बरडे, संजय घुगल, प्रिती जाधव, The Rock Riders Association अमोल ढोबळे, दिलीप वरकड, दिलीप बिरे, सारंग पांडे, डॉ. सुषमा खंडागळे, जयंत मेंढी, डॉ. भावना, आशिष पटले, मनोज जाधव, योगेश पापडकर, विष्णू शेंडे, यश घुगल यांचा समावेश होता. या सायकल वारीत सहभागी सर्वांनी महिला सशक्तीकरण व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले, तर कार्यक्रमाने समाजात सकारात्मक संदेश पसरविला.
सौजन्य: सारंग पांडे, संपर्क मित्र