विद्यार्थ्याचा वाढदिवशी अपघाती मृत्यू

13 Mar 2026 21:33:07
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
student-dies-in-accident-on-birthday : आर्णी येथील यश उर्फ मुन्ना दीपक पाटील याचा गुरुवार, 12 मार्चला 19 वा वाढदिवस होता. या वाढदिवशीच यवतमाळ येथे यशचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
 
 
y13March-Yash-Patil
 
 
 
आर्णीचे दीपक पाटील यांचा मुलगा यश हा यवतमाळ येथील दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकत होता. गुरुवारी संध्याकाळी वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रांसोबत जात असताना यवतमाळच्या दारव्हा रस्त्यावर देवगड हॉटेलसमोर त्याचा अपघाती मृत्यू झाला.
 
 
अपघाताची माहिती कळताच यशच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने यवतमाळकडे धाव घेतली. यशला वाढदिवशीच अपघाती मरण आल्याने आर्णीत हळहळ व्यक्त होत आहे.
 
 
वडील दीपक, आई ज्योती आणि मोठी बहीण राणी यांना सोडून गेलेल्या यशच्या अपघाती मृत्यूने पाटील कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. आर्णीच्या हिंदू स्मशानभूमीवर शोकाकुल वातावरणात यश पाटीलवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0