मातेच्या अंगाखाली दबून चिमुकलीचा मृत्यू

13 Mar 2026 21:07:08
मोर्शी, 
toddler-dies : आईचा पायात पाय अडकल्यामुळे ती खाली पडली व कडेवर असलेली १५ दिवसाची मुलगी तिच्या अंगाखाली दबून मृत्यू पावल्याची घटना गुरूवारी १२ मार्च रोजी दुपारच्या दरम्यान उघडकीस आली.
 

k 
 
 
 
याबाबत मोर्शी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रुषी आकाश लांगापुरे असे मृतक चिमुकली मुलीचे नाव आहे. वरूड तालुक्यातील अमडापूर येथील भराडी समाजातील कुटुंब दुर्गवाडा जवळच असलेल्या अंधारे लेआऊटमध्ये खुल्या जागेवर पाल टाकून वास्तव्य करीत आहे. मृतक चिमुकलीची आई सुनीला आकाश लांगापुरे (२६) पती व दोन मुलीसह खुल्या प्लॉटवर पाल टाकून राहते. ११ मार्च रोजी सुनीलाचा पती आकाश लांगापुरे याच्यासोबत तिच्या जेवन करण्यावरून वाद झाला होता. त्यामुळे ती रागाच्या भरात वरूड येथे निघून गेली होती. ती गुरुवार १२ मार्च रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान दुर्गवाडा येथे आली होती. केवळ पंधरा दिवसाची मुलगी रुषी अंगाखाली दाबल्या गेली. या घटनेत मुलीच्या पाठीला व हाताला खरचटले गेले. तिला काही झाले नसेल म्हणून तिने तिला अंगावरचे दूध पाजून पाळण्यात टाकले. त्यावेळी तेथे बाजुच्या पालामध्ये राहणार्‍या एका महिलेने तिला पाळण्यातून काढून दाखव असे म्हटले असता मुलगी रुषी हिचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. या घटनेमुळे आईसह संपूर्ण कुटुंब आक्रोश करायला लागले. या प्रकरणी अधिक तपास मोर्शी पोलिस करीत आहे.
Powered By Sangraha 9.0