शिवशक्तीनगर नं. २ मध्ये दोन दिवसीय हिंदू संमेलन

13 Mar 2026 19:06:06
नागपूर,
Shivshakti Nagar राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी निमित्त, सकल हिंदू समाजाच्या वतीने दक्षिण नागपूर येथील मानेवाडा रिंग रोडवरील श्री हनुमान मंदिर, शिवशक्तीनगर नंबर २ येथे शनिवारी १४ मार्च आणि रविवारी १५ मार्च सायंकाळी ४ ते ८ वाजेपर्यंत दोन दिवसीय हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे उद्देश संपूर्ण देशातील हिंदू समाज एकत्रित, संघटित आणि आत्मबलसंपन्न बनवणे तसेच समाज जागृतीसाठी प्रयत्न करणे असा आहे. हिंदू समाजाची जनजागृती, संघटन एकत्रित करणे आणि भारत मातेचे रक्षण करण्यासाठी मातांनी, युवकांनी, युवतींनी सहभागी होणे आवश्यक असल्याचे आयोजकांनी आवाहन केले आहे.
 
Shivshakti Nagar
 
सदर संमेलनात प्रमुख उपस्थितीत संत श्री महादेव महाराज (आनंदगढ, काटोल), श्रीकांत चितळे आणि कीर्ती काळमेघ (वनकर) उपस्थित राहणार आहेत. Shivshakti Nagar शनिवारी १४ मार्च रोजी दुपारी ३ ते ५ वाजता चित्रकला व रांगोळी स्पर्धा होईल, तर सायंकाळी ६ वाजता हनुमान चालीसा पठण, आरती, पथनाट्य आणि वकृत्व सादरीकरणाचे कार्यक्रम आयोजित आहेत. रविवारी १५ मार्च रोजी सकाळी ८:३० ते १०:३० या दरम्यान संत श्री गजानन महाराजांचे पारायण होईल. दुपारी ३:३० ते ६ वाजता शोभायात्रा व सायंकाळी ६:३० ते ८ वाजता समारोप आणि तत्पश्चात प्रसाद वितरण होईल, असे संयोजकांनी सांगितले आहे.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0