दीनदयालनगर मध्ये आरोग्यविषयक मार्गदर्शनासह विविध उपक्रम

13 Mar 2026 14:29:58
नागपूर,
Deendayalnagar आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दीनदयालनगर येथे दीनदयाल नगर, मुक्तागणं आणि भक्तीसुधा यातील महिलानी संयुक्त विद्यमाने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम रंजना ढोले यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. माधुरी इंदूरकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी महिलांनी आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या सवयींबाबत उपयुक्त मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या दारव्हेकर यांनी केले. कल्पना वाराणशिवार यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले.
 
 
Deendayalnagar
 
यावेळी शीला जोशी यांनी “थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला… पणती जपून ठेवा, अंधार फार झाला” हे सुंदर गीत सादर केले. गीता चिकरूर यांनी महिला दिन कसा अर्थपूर्ण पद्धतीने साजरा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच वैशाली पितळे आणि वर्षा देशपांडे यांनी विविध खेळांचे आयोजन करून कार्यक्रमात रंगत आणली. Deendayalnagar कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संध्या देशकर यांनी केले. हा महिला दिनाचा कार्यक्रम आनंददायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
सौजन्य: कल्पना वाराणशिवार, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0