नवी दिल्ली
internet data देशात येत्या काळात मोबाईल इंटरनेट वापर महाग होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार मोबाईल इंटरनेट डेटावर देखील नवीन कर लावण्याच्या पर्यायाची चाचपणी करीत आहे. प्राप्त माहितीनुसार, यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन या विभागाला याबाबत अभ्यास करण्यास सांगण्यात आले आहे. आता हा विभाग डेटा युसेजवर कर लावणं शक्य आहे की नाही, हे पाहणार आहे.
internet data टेलिकॉम विभागाच्या एका आढावा बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली. यानंतर संबंधित विभागाला, मोबाईल डेटा वापरावर कर लावता येऊ शकतो का, याची तपासणी करा, असे सांगण्यात आले. जर कर लावता येत असेल तर त्याचे स्वरूप कसे असेल याचा देखील अभ्यास केला जात आहे.सरकार ज्या पर्यायाची चाचपणी करत आहे त्यात एक रुपया प्रती जीबी डेटावर कर लावण्याची शक्यता आहे. असे झाले तर यूजर जितका डेटा वापरेल तसे त्यावर अतिरिक्त शुल्क लागू होईल. म्हणजेच याचा फटका वापरकर्त्यांनाच बसणार आहे.