पाकवर १८ वर्षांपूर्वीच बंदी, तरीही काव्या मारनने अबरारला का विकत घेतले?

13 Mar 2026 12:21:36
नवी दिल्ली 
kavya-maran-buy-abrar इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या शंभर चेंडूंच्या क्रिकेट स्पर्धेच्या लिलावात घेतलेल्या एका निर्णयामुळे क्रिकेटविश्वात मोठी चर्चा रंगली आहे. भारतीय मालकीच्या संघाने पाकिस्तानच्या फिरकी गोलंदाज अबरार अहमद याला मोठ्या रकमेत करारबद्ध केल्याने हा विषय विशेष चर्चेत आला आहे.
 
kavya-maran-buy-abrar
 
इंग्लंडमधील शंभर चेंडूंच्या स्पर्धा द हंड्रेड साठी झालेल्या खेळाडूंच्या लिलावात भारतीय मालकीच्या सनरायझर्स लीड्स संघाने अब्रार अहमदला सुमारे एक लाख नव्वद हजार पौंड म्हणजेच अंदाजे दोन कोटींहून अधिक रुपयांत आपल्या ताफ्यात सामील केले. खेळाच्या दृष्टीने पाहता हा केवळ संघाच्या गरजेनुसार घेतलेला रणनीतीचा निर्णय मानला जातो. कोणतीही संघटना आपल्या संघासाठी योग्य आणि प्रभावी खेळाडू निवडण्याचा प्रयत्न करते. मात्र भारतात या निर्णयाकडे केवळ क्रीडा दृष्टिकोनातून न पाहता त्याचा संबंध भारत-पाकिस्तान संबंधांशी जोडला गेला. kavya-maran-buy-abrar त्यामुळे समाजमाध्यमांवर या विषयावर मोठा वाद रंगताना दिसत आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना नेहमीच भावनिक विषय राहिला आहे. दोन्ही देशांमधील राजकीय संबंध दीर्घकाळ ताणलेले असल्याने त्याचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. त्यामुळे या दोन देशांमध्ये द्विपक्षीय मालिका अनेक वर्षांपासून खेळल्या जात नाहीत.
ही परिस्थिती स्पर्धात्मक संघांच्या क्रिकेटमध्येही दिसून आली आहे. २००८ मध्ये सुरू झालेल्या जगातील सर्वात मोठ्या वीस षटकांच्या स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्या वेळी सोहेल तन्वीर, शाहिद आफ्रिदी आणि शोएब अख्तर यांसारखी नामांकित खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून खेळताना दिसले होते. त्या हंगामात कोलकाता संघाकडून सलमान बट, शोएब अख्तर, मोहम्मद हाफीज आणि उमर गुल हे चार पाकिस्तानी खेळाडू खेळले होते. kavya-maran-buy-abrar राजस्थानच्या संघात कामरान अकमल, युनूस खान आणि सोहेल तन्वीर यांचा समावेश होता. दिल्लीच्या संघाकडून मोहम्मद आसिफ आणि शोएब मलिक यांनी खेळले, तर शाहिद आफ्रिदी डेक्कन संघाकडून आणि मिसबाह-उल-हक बंगळुरूच्या संघाकडून मैदानात उतरले होते. त्या वर्षी एकूण अकरा पाकिस्तानी खेळाडूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता. नंतर माजी पाकिस्तानी अष्टपैलू अझहर महमूद ही या स्पर्धेत खेळ केला होता. मात्र त्यावेळी त्यांनी ब्रिटनचे नागरिकत्व स्वीकारले होते.
२००८ नंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या राजकीय तणावाचा परिणाम या स्पर्धेवरही झाला. त्यानंतरच्या लिलावांमध्ये पाकिस्तानी खेळाडूंना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे गेल्या दीड दशकात कोणताही सक्रिय पाकिस्तानी आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसलेला नाही. याच कारणामुळे जेव्हा भारतीय मालकीची एखादी संघटना परदेशातील स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूला आपल्या संघात सामील करते, तेव्हा ती बातमी लगेच चर्चेचा विषय ठरते. दरम्यान, अब्रार अहमदला करारबद्ध करणारा संघ पूर्वी नॉर्दर्न सुपरचार्जर्स या नावाने ओळखला जात होता. मागील वर्षी भारतीय माध्यम समूह सन ग्रुपने या संघाचे मालकी हक्क विकत घेतले. त्यानंतर संघाचे नाव बदलून सनरायझर्स लीड्स असे ठेवण्यात आले.
 
सन ग्रुपकडे आधीच सनरायझर्स हैदराबाद आणि सनरायझर्स ईस्टर्न केप या फ्रँचायझी आहेत. द हंड्रेड स्पर्धेत त्यांची उपस्थिती भारतीय गुंतवणूकीला अधिक बळकटी देते. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांचे लक्ष या संघाच्या प्रत्येक निर्णयावर ठाम असते.
लिलावापूर्वीची माहिती
लिलावापूर्वी लीग आणि सर्व फ्रँचायझींनी स्पष्ट केले होते की खेळाडूंची निवड फक्त तीन निकषांवर आधारित असेल:
कामगिरी
उपलब्धता
संघाची गरज
याचा अर्थ असा की खेळाडूची राष्ट्रीयता निवडीत प्राधान्य मिळणार नाही. या धोरणाचे पालन करत सनरायझर्स लीड्सने आपला फिरकी हल्ला अधिक मजबूत करण्यासाठी अब्रार अहमदची निवड केली.
क्रिकेटच्या दृष्टीने हा निर्णय पूर्णपणे व्यावहारिक मानला जातो. अब्रार अहमद आपल्या गूढ फिरकी आणि विविध प्रकारच्या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये असे फिरकीपटू अनेक वेळा फलंदाजांसाठी आव्हान ठरतात. टीम मॅनेजमेंटच्या मते, अब्रारमध्ये पॉवरप्लेनंतर मधल्या षटकांत विकेट घेण्याची क्षमता आहे, जी लहान स्वरूपाच्या क्रिकेटमध्ये महत्त्वाची ठरते. त्यामुळे फ्रँचायझीने त्याला संघाच्या रणनीतीसाठी अत्यंत उपयुक्त खेळाडू मानले.
 
Powered By Sangraha 9.0