थकीत मालमत्ता करावरील व्याजात ५० टके सवलत

पुलगाव नपचा जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
पुलगाव
Pulgaon प्रलंबित मालमत्ता कर आणि नगरपालिका व्यापारी संकुलांच्या थकीत करावरील शास्ती (व्याज) माफीचा निर्णय मार्गी लागत आहे. महाराष्ट्र शासनाच्या मे २०२५ च्या आदेशानुसार, थकीत करावर लागणार्‍या २ टके व्याजामध्ये ५० टके सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव पुलगाव नगरपरिषदेने जिल्हाधिकार्‍यांकडे मंजुरीसाठी पाठवला आहे.
 

property tax 
मे २०२५ पासून नगरपालिकेत प्रशासक राज होते. सत्तेत आलेल्यांनी या विषयाला प्राधान्य दिले आहे. नगराध्यक्ष कविता बाम्हणकर, मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा आणि उपाध्यक्ष दीपक आहुजा व नगरसेवकांनी चर्चा करून हा विषय सर्वसाधारण सभेत मांडला. सभेत सर्वानुमते या ५० टके शास्ती माफीवर शिक्कामोर्तब करण्यात आले.
नगरपालिकेच्या नियमानुसार, थकीत करावर दरमहा २ टके व्याज (शास्ती) आकारले जाते. आता मुद्दलीवर साचलेल्या २ टके व्याजावर ५० टके सूट दिली जाणार आहे. ही योजना ३१ मार्चपर्यंत लागू राहणार आहे.
जिल्हाधिकार्‍यांची मंजुरी मिळताच नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि आपल्या मालमत्ता कराचा भरणा करून दंडातून सवलतीचा लाभ घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.