मुंबई
Blessing Muzarabani आगामी आयपीएल २०२६ च्या सुरुवातीच्या तयारीदरम्यान कोलकाता नाइट राइडर्स (KKR) ने जिम्बाब्वेच्या वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीला आपल्या संघात समाविष्ट केले आहे. मुजरबानी यांची निवड मुस्तफिजुर रहमानच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून करण्यात आली असून, केकेआरने हा निर्णय देशातील गाजलेल्या वादानंतर घेतला आहे.
मुजरबानीने पाकिस्तान सुपर लीग (PSL) मधील इस्लामाबाद युनायटेड संघ सोडून आयपीएलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. केकेआरमध्ये सामील होण्यापूर्वी, मुजरबानी यांची PSL संघात निवड शमार जोसेफच्या जागी झाली होती, मात्र आयपीएलच्या संधीसाठी त्यांनी PSL सोडणे योग्य समजले. यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आता त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे.PCB ने २९ वर्षीय मुजरबानी विरुद्ध लीगल एक्शन घेण्याचे नियोजन सुरु केले आहे. असे पहिलेच उदाहरण नाही की एखाद्या खेळाडूने PSL सोडून IPL मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कॉर्बिन बॉशने PSL सोडून मुंबई इंडियन्ससाठी खेळण्याचे ठरवले होते.
ब्लेसिंग मुजरबानी यांचे Blessing Muzarabani प्रदर्शन आंतरराष्ट्रीय स्तरावरही उत्कृष्ट राहिले आहे. टी20 वर्ल्ड कपमध्ये त्यांनी जिम्बाब्वेला सन्मानजनक कामगिरी करून सुपर-८ फेरीत पोहोचण्यास मदत केली होती. त्यांनी सहा सामन्यांमध्ये १३ विकेट्स घेऊन टुर्नामेंटमधील दुसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले होते. विशेषतः ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ग्रुप स्टेज सामन्यात त्यांनी चार विकेट्स घेऊन जिम्बाब्वेची विजयकथा लिहिली होती.आता KKR संघाने आपल्या आयपीएल खेळाडूंच्या कामगिरीसाठी मुजरबानीकडून तसेच टी20 वर्ल्ड कपसारखा धाकाड प्रदर्शनाची अपेक्षा ठेवली आहे. या निर्णयामुळे संघाला वेगवान गोलंदाजांची ताकद वाढेल, तसेच चाहत्यांमध्ये आगामी हंगामाबद्दल उत्साह निर्माण झाला आहे.याबरोबरच, PSL आणि PCB च्या कारवाईच्या शक्यतेमुळे आगामी काळात दोन्ही लीग्समध्ये खेळाडूंच्या निवडीसंबंधी चर्चा सुरु होणार आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संघांची रणनीती आणि खेळाडूंचे अधिकार याबाबत नव्या वादास्पद प्रसंग निर्माण होऊ शकतात.