चित्रपटांसाठी नवा नियम; सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन बंधनकारक

14 Mar 2026 11:26:09
मुंबई
Indian films accessibility चित्रपट प्रेक्षकांसाठी सुलभता वाढवण्याच्या उद्देशाने सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन (सीबीएफसी) ने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या निर्देशानुसार, १५ मार्च २०२६ पासून सर्व भारतीय चित्रपटांमध्ये सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन समाविष्ट करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निर्णयामुळे दृश्य आणि श्रवणदोष असलेल्या प्रेक्षकांनाही चित्रपट अधिक सहजपणे अनुभवता येणार आहेत.
 

CBFC new rules, Indian films accessibility 
सीबीएफसीने दिलेल्या निर्देशांनुसार, चित्रपट निर्मात्यांनी सेन्सॉर प्रमाणपत्रासाठी चित्रपट सादर करताना त्यामध्ये सबटायटल्स आणि ऑडिओ वर्णन समाविष्ट असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच ‘ई-सिनेप्रमाण’ पोर्टलद्वारे डिजिटल सिनेमा पॅकेज (डीसीपी) स्वरूपात चित्रपट अपलोड करतानाही ही प्रवेशयोग्यता वैशिष्ट्ये समाविष्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे.या नियमामागील मुख्य उद्देश म्हणजे दृश्यदोष किंवा श्रवणदोष असलेल्या प्रेक्षकांसाठी चित्रपट अधिक सुलभ करणे. त्यामुळे अशा प्रेक्षकांना कथानक, संवाद आणि घडामोडी अधिक स्पष्टपणे समजून घेता येणार आहेत.
 
 
दरम्यान, सेन्सॉर Indian films accessibility  बोर्डाच्या या निर्णयावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. अनेकांनी या निर्णयाचे स्वागत करताना हा प्रेक्षकांच्या दृष्टीने सकारात्मक आणि समावेशक पाऊल असल्याचे म्हटले आहे. तर काहींनी मात्र यामुळे थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याचा अनुभव बाधित होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली आहे.काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी सबटायटल्समुळे चित्रपट पाहताना लक्ष विचलित होऊ शकते, असे मत व्यक्त केले आहे. विशेषतः हिंदी किंवा इतर भारतीय भाषांतील चित्रपटांसाठीही सबटायटल्स अनिवार्य असणे आवश्यक आहे का, असा प्रश्नही काहींनी उपस्थित केला आहे.या पार्श्वभूमीवर सीबीएफसीच्या नव्या निर्णयामुळे चित्रपट उद्योगात तसेच प्रेक्षकांमध्ये मोठी चर्चा रंगली असून पुढील काळात या नियमाची अंमलबजावणी कशी होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0