बामर्डा हत्याकांडाची सीआयडी चौकशी करा

14 Mar 2026 17:09:42
वर्धा,
bamrada massacre चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुयातील बामर्डा वाळूघाट लिलावाच्या वादातून झालेल्या हत्याकांडाची सखोल चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) करण्यात यावी, अशी मागणी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर आणि आ. राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली.
 
 
bamrada massacre
 
 
१ मार्च रोजी वरोरा तालुयातील बामर्डा वाळूघाट लिलावाच्या वादातून अत्यंत हिंसक घटना घडली. वाळू उत्खननाच्या हकावरून दोन गटांमध्ये तीव्र वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर प्राणघातक हल्ल्यात झाले. या घटनेत पुलगाव येथील भरत नागपाल यांचा १० ते २५ जणांच्या टोळयाने तलवारीने निर्घृणपणे खून करून मृतदेह नदीत फेकून दिला. या हल्ल्यात काही नागरिक गंभीर जखमी झाले असून संतप्त जमावाकडून घटनास्थळी उभी असलेली जेसीबी मशीन जाळण्यात आली. तसेच ३ ते ४ वाहनांची तोडफोड करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती व तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. तसेच वाळू उत्खनन व घाट लिलाव प्रक्रियेमध्ये संभाव्य अनियमितता, स्थानिक प्रशासनाची भूमिका आणि या गुन्ह्यामागील खरे सूत्रधार कोण आहेत, याचा शोध घेणे अत्यंत आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
 
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक स्तरावरील चौकशीऐवजी स्वतंत्र, निष्पक्ष व सखोल तपासासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) मार्फत चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करून पीडित कुटुंबास तातडीने संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला.bamrada massacre संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कारवाई करण्याबाबत निर्देश देण्यात येतील, असे त्यांनी आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर संताप व्यत होत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडूनही केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0