सावित्रीबाई फुले स्मृतिदिन व महिला दिनानिमित्त कार्यक्रम

14 Mar 2026 12:31:39
नागपूर ,
Deendayal Antyodaya Yojana दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत निधी वस्ती स्तर संघ व महिला बचत गटाच्या वतीने मातोश्री रमाई भवन, भानखेड़ा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिन व जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
 
 

127 
 
 
अध्यक्षस्थानी डॉ. शीतल गोविंवार होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या समुदाय संघटक चित्रा लोखंडे, यामिनी उकंडे, भावना यादव यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.Deendayal Antyodaya Yojana दीपप्रज्वलन करून सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.यावेळी बचत गटातील महिलांनी पारंपरिक नृत्य सादर केले तसेच महिला बचत गटांद्वारे महिलांचे सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन पुष्पा नंदेश्वर यांनी केले. संचालन रुपेश साखरे यांनी केले.
सौजन्य: यामिनी ठेवले,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0