आनंदवार्ता... 'या' राज्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पुन्हा सुरू

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
नवी दिल्ली,
commercial gas cylinders resumed देशभरात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आला असून रेस्टॉरंट, हॉटेल आणि ढाबा व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुझाता शर्मा यांनी आज याबाबत माहिती देताना सांगितले की देशातील २९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण सुरू झाले आहे आणि ग्राहकांना नियमितपणे सिलिंडर मिळत आहेत. सध्या गॅस सिलिंडरचे सुमारे ८४ टक्के आरक्षण दूरध्वनी व डिजिटल माध्यमांद्वारे होत असून ते जवळपास शंभर टक्क्यांपर्यंत नेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
 
commercial gas cylinders resumed
 
दरम्यान, अलीकडील काही दिवसांत घरगुती गॅस सिलिंडरच्या आरक्षणात मोठी वाढ झाल्याचेही त्यांनी सांगितले. १२ मार्च रोजी देशभरात सुमारे ७.५ ते ७.६ दशलक्ष घरगुती गॅस सिलिंडरचे आरक्षण झाले होते. commercial gas cylinders resumed १३ मार्च रोजी ही संख्या वाढून सुमारे ८.८८ दशलक्षांवर पोहोचली. ही वाढ प्रामुख्याने घाबरून केलेल्या आरक्षणामुळे झाल्याचे सरकारचे म्हणणे आहे. सामान्य परिस्थितीत दररोज सुमारे ५ ते ५.५ दशलक्ष घरगुती सिलिंडरचे आरक्षण होत असते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यकतेनुसारच गॅस सिलिंडरचे आरक्षण करावे, असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे.
 
घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी उत्पादनातही टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात येत आहे. सुरुवातीला सुमारे १० टक्के असलेले उत्पादन वाढवून २५ टक्के, त्यानंतर २८ टक्के आणि आता ते सुमारे ३१ टक्क्यांपर्यंत नेण्यात आले आहे. तसेच गॅसच्या आरक्षणासाठी निश्चित कालावधीची अटही लागू करण्यात आली आहे. commercial gas cylinders resumed शहरांमध्ये शेवटचा सिलिंडर मिळाल्यानंतर किमान २५ दिवसांनी पुढील आरक्षण करता येणार आहे, तर ग्रामीण भागात हा कालावधी जास्तीत जास्त ४५ दिवसांचा असेल. त्यामुळे ग्राहकांनी पुढील आरक्षण करताना या कालमर्यादेची नोंद ठेवावी, असा सल्ला देण्यात आला आहे. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर, देशात गॅस सिलिंडरच्या कमतरतेमुळे व्यापक चिंता निर्माण झाली आहे. तथापि, परिस्थिती वेगाने सुधारत आहे.