भारतीय स्त्री शक्तीतर्फे उद्योजिका प्रदर्शनाचे उद्घाटन

14 Mar 2026 16:27:32
नागपूर,
Indian Woman Power भारतीय स्त्री शक्ती संघटनेतर्फे आयोजित उद्योजिका प्रदर्शनाचे उद्घाटन मातृसेवा संघच्या डॉ. लता देशमुख यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये विविध महिला उद्योजिकांनी आपली उत्पादने मांडून स्वावलंबनाचा संदेश दिला.

 


angha  
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी नागपूर शाखेच्या अध्यक्षा नीलम पर्वते यांनी प्रास्ताविक करत भारतीय स्त्री शक्तीच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. महिला उद्योजिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे व त्यांना प्रोत्साहन देणे हा या प्रदर्शनाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. Indian Woman Power या प्रसंगी अनेक महिला उद्योजिका व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव मेघा कोरडे यांनी केले.
सौजन्य :अनघा आंबेकर,संपर्क मित्र  
Powered By Sangraha 9.0