ग्रंथालय भारतीचे राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार जाहीर

14 Mar 2026 17:16:47
नागपूर,
Best Library Award announced  क्षेत्रात कार्यरत असलेल्या ग्रंथालय भारती या संस्थेतर्फे दरवर्षी उत्कृष्ट ग्रंथपाल, उत्कृष्ट ग्रंथालय आणि उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता असे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीही राज्यभरातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची निवड करून पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
 

नागपूर
 
यंदाचा मंगला गोविंद पांडे उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, वडाळा (मुंबई) येथील ग्रंथपाल दिलीप शिवराम नवेले आणि कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालय, बोरी (ता. जिंतूर, जि. परभणी) येथील ग्रंथपाल नेमीनाथ जयकुमार जैन यांना जाहीर झाला आहे. Best Library Award announced साधना विनोद लोकरे स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार कोल्हापूर येथील करवीर वाचन मंदिर या जिल्हा ‘अ’ दर्जाच्या वाचनालयाला जाहीर करण्यात आला आहे. तसेच गुलाबबाई राधाकिसन बाहेती स्मृती उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता पुरस्कार शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय, रिद्धपूर (ता. मोर्शी, जि. अमरावती) चे सचिव प्रदीप त्र्यंबकराव चौधरी यांना प्रदान करण्यात येणार आहे.
 
हे पुरस्कार रविवार, दि. १५ मार्च २०२६ रोजी नागपूर येथील श्रीराम सभागृहात दुपारी ४ वाजता आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालय भारतीचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. राजशेखर बालेकर राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामायण प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल सांबरे उपस्थित राहतील. तर प्रमुख वक्ते म्हणून प्रसिद्ध स्तंभलेखक अमोल पुसदकर मार्गदर्शन करणार आहेत. Best Library Award announced या पुरस्कार वितरण सोहळ्यास ग्रंथप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ग्रंथालय भारतीचे केंद्रीय कार्याध्यक्ष रवींद्र गोविंद पांडे, सचिव सुनील वायाळ, विदर्भ प्रांताध्यक्ष डॉ. अभय टोंगो, संघटन सचिव राजेश राठोड, नागपूर महानगर अध्यक्ष प्रशांत तुंगार आणि सचिव विनय पंडे यांनी केले आहे.
सौजन्य: रवींद्र पांडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0