देशातील गॅस टंचाईवर राऊतांचासरकारवर घणाघात

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
मुंबई ,
Sanjay Raut आंतरराष्ट्रीय युद्धामुळे संपूर्ण जगभरातील आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीवर परिणाम होत असतानाच, भारतातील सामान्य नागरिकांचा जीवनमानही यामुळे खालावले आहे. युद्धामुळे निर्यातीत अडथळा निर्माण झाला असून शेकडो उद्योगांच्या मालाची देशात साठवण झाली आहे, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या परिस्थितीत गॅस टंचाईने लोकांचे जीवन अधिकच अवघड केले आहे. नागरिकांना गॅस सिलेंडरसाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. हॉटेल मालकांना स्वयंपाकासाठी चुलीचा आधार घ्यावा लागत असून काही ठिकाणी हॉटेल्स बंद करण्याची वेळ येत आहे. महाराष्ट्रासह देशभरात ही स्थिती स्पष्टपणे जाणवते.
 

LPG cylinder shortage India, gas shortage Maharashtra, Sanjay Raut criticism 
याच मुद्यावरून शिवसेना Sanjay Raut  ठाके गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. राऊत म्हणाले, “माझ्या घरात ही परिस्थिती आहे. माझ्या पत्नीला दोन दिवसांपासून सिलेंडर मिळत नाही. महानगर गॅस उपलब्ध असतानाही एखादं सिलेंडरही मिळत नाही. सकाळपासून 60-70 लोकं मला भेटली आहेत, जे सिलेंडर कुठून मिळेल असा प्रश्न विचारत होते. राजधानी दिल्लीमध्ये एका घोषणेनंतर धूम माजली आहे, ती म्हणजे ‘नरेंद्र गायब, सिलेंडर गायब’. याचे उत्तर नरेंद्र मोदींनी द्यायला हवे.”देशभरात सिलेंडरसाठी मोठमोठ्या रांगा दिसत आहेत. लखनऊ, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, दिल्ली ते जम्मूपर्यंत नागरिक रांगेत उभे आहेत. रांगा इतक्या मोठ्या झाल्या आहेत की, नोटबंदीच्या काळात ज्या परिस्थितीची चर्चा होती, तीच आता सिलेंडर रांगेत होऊ शकते, अशी भयंकर स्थिती देशभर दिसत आहे. राऊतांनी यावरही जोर देत म्हटले की, “लोकांना रांगेत उभं करणं आणि मारणं हा भारतीय जनता पार्टीचा छंद आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात सरकार अपयशी ठरल्यामुळे ही परिस्थिती आपल्या देशावर आली आहे.”
राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र Sanjay Raut  मोदींवरही खोचक शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले, “कोविडच्या काळात जसं सांभाळून घेतलं, ही परिस्थिती देखील सांभाळेन, असे पंतप्रधान म्हणाले. पण कोविडच्या काळात लोकांची प्रेतं गंगेत वाहत होती, गुजरातमध्ये स्मशानभूमीत लोकांना जागा नव्हती… काय सांभाळलं त्यांनी?” असे खोचक प्रश्न विचारत त्यांनी मोदींवर जोरदार हल्ला चढवला.सध्याच्या परिस्थितीमुळे नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. गॅस टंचाई, निर्यातीत अडथळा, उद्योगांच्या नुकसानासह नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागणे, यामुळे देशभरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.