केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ रुग्णालयात

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
पुणे
Murlidhar Mohol पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात आज यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. २९ वर्षांपूर्वी कुस्तीच्या आखाड्यात झालेल्या जुन्या दुखापतीमुळे या शस्त्रक्रियेची आवश्यकता निर्माण झाली होती. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मोहोळ यांना आता किमान महिनाभर सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
 

Murlidhar Mohol  
मोहोळ यांनी सोशल मीडियावर सांगितले की, २९ वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये कुस्ती खेळताना त्यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीमुळे त्यांचे कुस्तीचे स्वप्न अधुरे राहिले आणि त्यांनी कुस्ती सोडावी लागली. अनेक वर्षे या त्रासाकडे दुर्लक्ष केले असले, तरी अलीकडच्या काळात सततचा प्रवास आणि कामाच्या धावपळीमुळे हे दुखणे पुन्हा वाढले. अखेर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला.
सध्या संसदेचे अधिवेशन सुरू Murlidhar Mohol  असून, देशभरातील प्रवास, पुणे लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी भेटीगाठी आणि आगामी 'महाराष्ट्र केसरी' कुस्ती स्पर्धेच्या तयारीमुळे मोहोळ यांचे शारीरिक आरोग्य अधिक प्रभावित झाले होते. मोहोळ यांनी सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया देत म्हटले की, "दुखापतीपेक्षा जनसेवेतील कामांमुळे जास्त त्रास होत आहे, तरी तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वादामुळे मी लवकरच बरा होऊन महिन्याभरात पुन्हा अधिक जोमाने जनसेवेत हजर होईन."शस्त्रक्रियेनंतर मोहोळ पुढील सात ते आठ दिवस रुग्णालयात राहणार असून त्यांना घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुण्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मोहोळ यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, "क्षमस्व… पण एक महिन्याची सक्तीची विश्रांती! २९ वर्षांपूर्वी कोल्हापूर येथे कुस्ती खेळताना झालेली दुखापत, या दुखापतीमुळे कुस्ती कायमची सुटली. इतकी वर्षे दुर्लक्ष केलं, पण आता हळूहळू त्रास वाढला, शेवटी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले."शस्त्रक्रियेनंतर त्यांचे आरोग्य सुधारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, मोहोळ यांची जनता आणि सहकारी यांना लवकर बरा होण्याची अपेक्षा आहे.