‘त्या’ तिघांवर आज कामठीत अंत्यसंस्कार

14 Mar 2026 10:23:57
अनिल कांबळे
नागपूर, 
nagpur accident राजस्थान येथील रिंगस परिसरातील खाटु श्यामबाबा मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या कामठी येथील पारसे कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू झाला तर 7 जण गंभीर जखमी झाले हाेते. तीनही मृतदेह शनिवारी सकाळी नागपुरात आणण्यात येणार असून दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. महादेव ऋषी पारसे (52, कचरीपुरा, कामठी), कांता महादेव पारसे (45), मुलगा घनश्याम महादेव पारसे (22) अशी अपघाता मृत पावलेल्यांची नावे आहेत. आराधना चंद्रभान पारसे (26), पायल शंकर पारसे (22), पल्लवी चंद्रभान पारसे (21), पूनम यादव पारसे (20), तुषार महादेव पारसे (24) आणि पवन बागडे (22) आणि चालक मनाेज चिंदमवार अशी जखमींची नावे आहेत.
 
 
 
nagpur accident
 
 
 
महादेव पारसे हे 6 मार्चला तवेरा गाडीने कुटुंबीयांसह देवदर्शनासाठी गेले हाेते. बुधवारी 11 मार्च राेजी सायंकाळी राजस्थानातील रिंगस येथे खाटू श्यामबाबा मंदिरात दर्शनासाठी जात असताना जयपूर मार्गावरील सालासर परिसरात त्यांच्या तवेरा वाहनाला विरुद्ध दिशेने येणाèया अनियंत्रित पिकअप वाहनाने धडक दिली. या अपघातात तवेरा वाहनातील सर्वजण गंभीर जखमी झाले हाेते. मात्र, डाॅक्टरांनी तपासणी केल्यानंतर महादेव ऋषी पारसे, त्यांची पत्नी कांता महादेव पारसे आणि मुलगा घनश्याम महादेव पारसे यांना मृत घाेषित केले.
वाहन चालक मनाेज चिंदमवार यांच्यासह पारसे कुटुंबातील सहा जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू हाेते. जखमींनासुद्धा नागपुरात आणण्यात येत आहे.nagpur accident तिघांच्या मृतदेहांवर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून शनिवारी मृतदेह कामठी येथे त्यांच्या निवासस्थानी आणण्यात येणार आहेत. दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0