हिंदू संस्कृतीचे रक्षण स्वत:पासुन करा : भारती स्वामी महाराज

14 Mar 2026 17:05:57
रोहणा, 
protect hindu culture सकल हिंदूंना स्व-रक्षणाचे धडे गिरवणे गरजेचे आहे. धर्म संरक्षणासाठी आपल्या घरापासूनच मातृशतीने धडे देणे सुरू करावे. संत एकनाथ महाराज यांच्या अंगावर १०० वेळा थुंकल्यानंतर त्यांनी गोदावरी नदीत १०० वेळा स्नान केले. समोरच्या व्यतीस तुझ्यामुळे मला १०० वेळा स्नान घडले, असे सांगताच असभ्य वर्तन करणार्‍या त्या व्यतीने माफी मागीतली. पण, आज १०० वेळा थुंकणार्‍याचे मनगट तोडून त्याचेच हातात देण्याकरिता आपल्याकडे स्वरक्षणाची शती निर्माण करणे गरजेचे आहे. आज लव्ह जिहाद वाढता. त्याला रोखण्यासाठीच प्रत्येकाला स्वसंरक्षणाची गरज आहे, असे आशीर्वचन श्रीव्यंकटेशानंद भारतीस्वामी महाराज यांनी केले. स्थानिक सकल हिंदू समाज मंडळाच्या वतीने ग्रापं कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित विशाल हिंदू संमेलनात ते बोलत होते.
 

protect hindu culture 
 
 
अध्यक्षस्थानी गवळी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश माजी अध्यक्ष बाबासाहेब गलाट होते. तर ज्येष्ठ स्वयंसेवक शिवाजी अडसड, संत सेवा विद्यापीठ पाचोड येथील चैतन्य भूमा भारती दीदी, कैलास लोखंडे महाराज, आयोजन समितीचे प्रमुख प्रकाश टाकळे, प्रजापती ईश्वरीय ब्रह्मकुमारी गिता पाठशाला शाखा रोहणाच्या प्रमुख सविता दीदी, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र हिवसे उपस्थित होते.
भारती स्वामी महाराज पुढे म्हणाले, अल्लाउद्दीन खिलजी, मोगल राज्यकर्त्यांपासून इंग्रज राजवटीपर्यंत सर्वच हिंदू राज्यकर्त्यांनी कसा लढा दिला. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या शौर्याची माहिती देत हा खरा इतिहास शासनाने शिक्षणातून विद्यार्थ्यांना शिकविणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.
शिवाजी अडसड यांनी, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, ‘स्व’ आधारित जीवन व नागरी कर्तव्य या सर्वांची सुरूवात स्वत:पासून, स्वत:चे घरापासून केली तर त्याचे समाजात रोपण होईल आणि ते भारतात रूजेल.protect hindu culture जेव्हा त्याचे रोपण भारतात होईल तेव्हाच भारत एक मजबूत राष्ट्रच नव्हे तर हिंदू राष्ट्र बनेल, असेही त्यांनी सांगितले. चैतन्य भूमा भारती दीदी यांनी सनातन धर्मातील मूल्यांचे महत्त्व विशद केले.
 
बाबासाहेब गलाट यांनीही मागदर्शन केले.
संमेलनापूर्वी पालखी व शोभायात्रा काढण्यात आली. . संचालन प्रा. डॉ. तिर्थनदंन बन्नगरे यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन प्रकाश टाकळे यांनी केले. संमेलनाला रोहणा व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी प्रशांत गलाट, सुनील वाघ, राजेंद्र हिवसे, फनिंद्र रघाटाटे, तुषार चौधरी, स्वप्निल हिवसे, प्रवीण गेडे, धवन टाकळे, वैभव जगताप, अशोक कालोकार, गुणवंत सिरसाम, प्रकाश घोटकर, आशिष ईखार, रुपेश चव्हान, गिरीष कदम, पियुष टाकळे, वैभव शेंडे, आदींनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0