वक्तृत्व स्पर्धेत सौमित्र बोरीकर प्रथम !

14 Mar 2026 13:17:00
नागपूर,
Saumitra Borikar स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समिती, नागपूर तर्फे स्वर्गीय जगन्नाथराव नाईकवाडे स्मृतीप्रित्यर्थ सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त रोजी सी.पी. अँड बेरार कॉलेज येथे वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
 

vij  
 
 
या स्पर्धेच्या द्वितीय गटात (इयत्ता ८ व ९) श्री गजानन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता ९ वीचा विद्यार्थी सौमित्र श्रीरंग बोरीकर याने प्रथम क्रमांक मिळवला. शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात केंद्रीय मंत्री Nitin Gadkari यांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला.Saumitra Borikar  त्याच्या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक तंबाखे , उपमुख्याध्यापक अग्रवाल व पर्यवेक्षक कावटे यांनी अभिनंदन केले. तसेच शिक्षिका मीना बावणे व वैशाली डाखोळे यांचे मार्गदर्शन त्याला लाभले.
सौजन्य:विजय बोरीकर,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0