तंटामुत समितीचा अध्यक्षच गावातून गायब

गावकर्‍यांनी समस्या सोडविण्यासाठी जावे कुठे?

    दिनांक :14-Mar-2026
Total Views |
अल्लीपूर
Allipur महाराष्ट्र शासन निर्णयानुसार तंटामुत गाव अंतर्गत प्रत्येक गावात तंटामुत समिती स्थापन करून गावातील भांडण, तंटे गावातच मिटल्यास वेळ व पैसा वाचेल यासाठी दोन वर्षांआधी नव्याने पूर्ण समितीचे ग्रामपंचायत येथे विशेष ग्रामसभा घेऊन तंटामुत अध्यक्ष व समितीचे सदस्य गठीत करण्यात आले होते. आता मात्र, गावाचा तंटामुती अध्यक्षच गायब झाल्याने गावकर्‍यांनी समस्या सोडविण्यासाठी जावे कुठे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
tantamukti samiti 
Allipur घरगुती वाद, पती-पत्नी वाद, धुर्‍याचा वाद, नालीचा वाद अशा किरकोळ वादावर पोलिस स्टेशनला गेल्यावर ते दखल घेत नाहीत. असे वाद सोडविण्यासाठी तंटामुत समितीकडे दाद मागण्याचा सल्ला दिला जातो. आपसी व नातेवाईकांचा वाद असल्यास तो तंटामुतीकडे सोपविण्यात येतो. पण, आता तंटामुती अध्यक्षच गावातून दिसेनासा झाल्याने गावातील तंटे व वाद कोण सोडविणार हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासक यांनी दखल घेऊन येणार्‍या ग्रामसभेत ठराव घेऊन नवीन तंटामुक्त अध्यक्षांची निवड करावी, अशी मागणी गावकर्‍यांकडून केली जात आहे.