या गुढीपाडव्याला तयार नऊवारीमुळे ५ मिनिटांत मिळवा पारंपारिक मराठमोळा लूक

14 Mar 2026 11:24:16
traditional marathi look महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी महिलांमध्ये पारंपारिक पोशाख परिधान करण्याची विशेष परंपरा आहे. विशेषतःनवरी साडी नेसण्याची प्रथा आजही कायम आहे. मात्र नऊवारी साडी नेसणे हे थोडे अवघड आणि वेळखाऊ मानले जाते. योग्य पद्धतीने काष्टा बसवणे किंवा साडी व्यवस्थित नेसणे अनेक महिलांसाठी कठीण ठरते. त्यामुळे अलीकडच्या काळात बाजारात ‘तयार नऊवारी साडी’ हा नवा ट्रेंड लोकप्रिय होताना दिसत आहे. ही साडी पँटसारखी तयार असल्यामुळे केवळ ५ मिनिटांत परिधान करता येते आणि दिवसभर आरामदायकही राहते.
 
 


गुढीपाडव्याला नऊवारी साडीचा ट्रेंड 
 
तयार नऊवारीचे विविध ट्रेंडी पॅटर्न
आजकाल तयार नऊवारी साड्यांमध्ये अनेक आकर्षक डिझाइन्स उपलब्ध आहेत. प्रत्येक पॅटर्नचा स्वतःचा वेगळा लूक आणि स्टाईल आहे.
1. शाही मस्तानी पॅटर्न
हा पॅटर्न सध्या महिलांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. समोरून सुंदर काष्टा असलेली ही नऊवारी चालताना किंवा फिरताना अत्यंत आकर्षक दिसते. सणासुदीला रॉयल आणि एलिगंट लूक देण्यासाठी हा उत्तम पर्याय मानला जातो.
2. ब्राह्मणी पॅटर्न
पारंपारिक आणि मराठमोळा लूक हवा असेल तर ब्राह्मणी पॅटर्न उत्तम ठरतो. या प्रकारात मागे काष्टा असतो आणि तो धार्मिक विधी, पूजा किंवा पारंपारिक कार्यक्रमांसाठी विशेष योग्य मानला जातो.
3. राजलक्ष्मी पॅटर्न
मस्तानी आणि ब्राह्मणी या दोन शैलींचे मिश्रण म्हणजे राजलक्ष्मी पॅटर्न. यामध्ये पुढे पायघोळ आणि मागे काष्टा असतो. त्यामुळे साडीला एक वेगळा रॉयल लूक मिळतो. गुढीपाडव्याच्या दिवशी खास आकर्षक दिसण्यासाठी हा पॅटर्न अनेक महिला निवडतात.
4. काली स्टाईल नऊवारी
शोभायात्रा, लेझीम किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांसाठी ही स्टाईल अत्यंत सोयीची ठरते. यात साडीची रचना अशी असते की चालणे-फिरणे आणि हालचाल करणे सहज शक्य होते.
5. धोती स्टाईल नऊवारी
आजच्या जनरेशन-झेडमध्ये धोती स्टाईल नऊवारीही लोकप्रिय होत आहे. ही साडी पारंपारिक आणि इंडो-वेस्टर्न लूकचा सुंदर मिलाफ देते. यावर बेल्ट किंवा जॅकेट घालून नवीन फॅशन ट्रेंड तयार केला जात आहे.
पारंपारिकतेसोबत आधुनिक सोय
सणासुदीला पारंपारिक लूक राखत असतानाच आरामदायक आणि पटकन परिधान करता येणारा पर्याय म्हणून तयार नऊवारी साडी महिलांमध्ये लोकप्रिय होत आहे.traditional marathi look त्यामुळे गुढीपाडव्याच्या उत्सवात आधुनिकतेसोबत मराठमोळा पारंपारिक अंदाजही कायम ठेवता येतो.
Powered By Sangraha 9.0