गांधीजींच्या भूमीत विनोबा कचर्‍यात!

14 Mar 2026 20:05:51
प्रफुल्ल व्यास
सेवाग्राम  
Sevagram गांधी फॉर टुमारो ते सेवाग्राम विकास आराखडा असा प्रवास होत आता विकास शहरात चौफेर उधळल्या जात आहे. सेवाग्राम विकास आराखड्यातील किती कामं झाली आणि किती बाकी आहेत हे करणारेच जाणोत. पण, अनेक गोष्टींची अवहेलना येथे होताना दिसते. पाण्यासारखा पैसा आला. परंतु, वापर कमी आणि अपव्ययच जास्त! आता तर या विकास आराखड्यात तयार झालेला आचार्य विनोबा भावे यांचा पुतळा सेवाग्राम येथे कचर्‍याच पडून आहे. पुतळ्यावर प्रचंड धूळ साचली आहे. प्रशासनाला याची कितपत माहिती आहे, हे त्यांनाच माहिती!
 

vinoba statue 
Sevagram जगविख्यात असलेल्या सेवाग्राम येथील महात्मा गांधी वास्तव्यास असलेल्या जागांचा विकास करण्याची संकल्पना महाविकास आघाडीच्या काळात मांडल्या गेली. मात्र, त्याला मूर्तरूप महायुतीच्या काळात आले. धडायाने कामं सुरू झाली. रस्ते, चौक, पवनारच्या धाम नदीचे सौंदर्यीकरण, चरखा भवन या सौंदर्यीकरणाने वर्धा शहरला चार चाँदही लागले. अगदी लक्ष्मी नारायण मंदिरापर्यंत हा विकास पोहोचला. मुंबई येथील चित्रकला महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी येथे मुकाम ठोकत शहरातील काही चौकांमध्ये भींती चित्र साकारले तर चरखा भवन येथे वाहनांच्या सुट्या भागातून (भंगार)मधून महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांचे महाकाय पुतळे उभे केले. त्याच परिसरात जगातील सर्वात मोठा चरखाही बसवण्यात आला. त्यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पोलिस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी कार्यालयांमध्येही काचेच्या पेटीत चरखे पोहोचले होते. आता ते चखरे सुद्धा इकडून तिकडे फिरू लागले आहेत. या सेवाग्राम विकास आराखड्यात सेवाग्राम येथील चौकाचा ‘मनभरी’ असा विकास झाल्याचे उघड्या डोळ्यांनी तरी दिसत नाही. जे काही भींतीचित्र चौकात आहेत. ते भाजी आणि किरकोळ साहित्य विक्री करणार्‍यांच्या दुकानाच्या आड लपले आहेत. तरीही तेथे काही तरी असल्याचे दुरून का होई ना पण दिसुन येते. मात्र, सेवाग्राम चौकातून बस स्थानकाकडे जाताना अगदी ५० मिटर अंतरावर उजव्या बाजूला रस्त्यापासुन १० फुटांवर आचार्य विनोबा भावे यांचा पुतळा ठेवलेला आहे. त्या पुतळ्याच्या बाजूला भंगार हातठेला असुन पुतळ्याच्या आजूबाजूने झाडं झुडपं उगवली आहेत. उन्हाने ती झाडं वाळल्याने विनोबा भावे थोडे मोकळे दिसतात. Sevagram पावसाळ्यात तर पुतळा पाण्याच्या डबयात आणि आजूबाजूला गवत उगवले असे चित्र होते, असे फिरता फिरता कळले. बापूंच्या भुमीत विनोभाची अशी आबाळ फत प्रशासनाच्याच दुर्लक्षाने होऊ शकते. सेवाग्राम विकास आराखडा पुर्णत्वास गेला की नाही हे कोणीच सांगू शकत नाही. परंतु, या आराखड्यांतर्गत झालेल्या कामांच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी कोणाकडे आहे हेही कळू शकत नाही. चरखा भवनातील चरखा रात्री अंधारात असतो आणि सकाळी नागरिक महात्मा गांधी आणि विनोबांच्या पुतळ्या भोवती कुत्रे फिरवत असल्याचे छायाचित्र तरुण भारतला उपलब्ध झाले आहेत.
Sevagram वर्धा शहरात आता कुठे एवढ्यात लोकमान्य टिळकांचा पुतळा घाणीच्या साम्राज्यातून सुटला आहे. आता विनोबांचाही पुतळा दुर्लक्षित असल्याचे पुढे आले आहे.
महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे ज्या रस्त्याने प्रवास करायचे तो सेवाग्राम पवनार वाटेतही खड्ड्यांचे साम्राज्य आहे. सेवाग्राम येथे एका कोपर्‍यात पडून असलेल्या आचार्य विनोबा भावे पुतळ्याची नोंद तरी प्रशासनाकडे आहे का? असेल तर तो पुतळा काडीकचर्‍यात का असा प्रश्न विचारण्याची हिम्मत आजपर्यंत कोणी केलीच नाही. भूदान चळवळ ज्यांनी देशात सुरू केली. हजारो एकर जमीन त्यांनी जमा करून गरजूंना वाटून दिली. त्याच आचार्य विनोबा भावे यांच्या पुतळा कचर्‍यात. धाम नदीच्या सौंदर्याचे जे स्वप्न दाखवण्यात आले होते. तेही धाम नदीच्या पुरात वाहून गेले. आता विनोबांचा पुतळाही दुर्लक्षित व्हावा आश्चर्यच आहे. बघा त्या भूदात्याला हकाची कुठे जागा मिळते का?
 
Powered By Sangraha 9.0