‘लोहारडोंगरी’च्या वन्यजीव विषयक परवानगी रद्द करणार

14 Mar 2026 19:38:33
चंद्रपूर,
Wildlife permission ईको-प्रोचे अध्यक्ष बंडू धोतरे यांचे लोहाडोंगरी लोहखनिज प्रकल्पाच्या विरोधात गेल्या 9 दिवसांपासून सुरू असलेले अन्नत्याग सत्याग्रह अखेर शनिवार, 14 मार्च रोजी संपले. ‘लोहारडोंगरी’च्या वन्यजीव विषयक परवानगी रद्द करणार, असे सुधारित पत्र प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. त्यानंतर राज्याचे आदिवासी मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ अशोक उईके यांच्या हस्ते नारळपाणी घेत धोतरे यांनी उपोषण सोडले.
 
 
Wildlife permission
 
यावेळी डॉ. उईके यांच्यासह आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य वनसंरक्षक एन. रामनुजम, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग उपस्थित होते. यावेळी शासनातर्फे पाठविण्यात आलेल्या पत्राचे वाचन करून दाखविले गेले.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागतर्फे देण्यात आलेल्या पत्रात नमूद आहे की, राज्य वन्यजीव मंडळाच्या 6 जानेवारी 2026 रोजीच्या बैठकीत या खाण प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडे विविध अटी व शर्तीच्या आधारे शिफारस करण्यात आले आहे. तथापि, या प्रकल्पाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही करण्यास याव्दारे तुर्तास स्थगिती देण्यात येत आहे. तसेच मागणीच्या अनुषंगाने लोहारडोंगरी लोहखाण प्रकल्पाची राज्य वन्यजीव मंडळाने दिलेली वन्यजीव विषयक शिफारस रद्द करण्यासाठी पुढील बैठकीत निर्णय घेण्यात येईल. Wildlife permission सोबतच या परिसरातील मानव-वन्यप्राणी संघर्ष निवारणाच्या अनुषंगाने आपल्यामार्फत सादर करण्यात आलेल्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने वनमंत्री यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात येणार आहे.
 
या विजयाचे खरे शिल्पकार जनता : बंडू धोतरे
उपोषणाच्या मागण्या या पूर्णत: जिल्ह्यातील वन-वन्यजीव संवर्धन सोबतच मानव वन्यप्राणी संघर्ष निवारण्याच्या दृष्टीने महत्वाच्या असल्याने आणि हे आंदोलन व्यक्ती-संस्था पातळीवर न राहता, Wildlife permission जन आंदोलन झाल्याने त्याची दखल शासनाने घेतली. या विजयाचे खरे शिल्पकार चंद्रपूरची जनता आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी बंडू धोतरे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0