पोलिसांच्या १३४ पदांसाठी १७११ उमेदवारांची लेखी परीक्षा

14 Mar 2026 20:51:27
वर्धा
Wardha जिल्हा पोलिस दलातील १३४ रित पदांसाठी सुरू असलेली पोलिस भरती प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. शारीरिक व मैदानी चाचणीनंतर रविवारी १५ रोजी लेखी परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी १ हजार ७११ महिला व पुरुष उमेदवार पात्र ठरले आहेत. परीक्षा केंद्रावर सुरक्षेच्या दृष्टीने कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
 
 
police bharati
Wardha पोलिस दलातील भरती प्रक्रियेसाठी ७ हजार ३१३ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यानंतर ११ ते २३ फेब्रुवारी दरम्यान १० दिवस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक व मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये ५ हजार ५९९ उमेदवारांनी सहभाग घेतला होता. या प्रक्रियेत २ हजार २५ उमेदवार अपात्र ठरले तर ३ हजार ५७४ उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरले. १७११ उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे. ही लेखी परीक्षा सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च अंतर्गत असलेल्या फॅकल्टी ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेनॉलॉजी महाविद्यालयात घेण्यात येणार आहे.
Wardha बाहेरील जिल्ह्यांतून येणार्‍या उमेदवारांसाठी जिल्हा क्रीडा संकुल, रामनगर येथील तुकाराम मठ, महादेवपुरा येथील महादेव मंदिर तसेच रेल्वे कॉलनीतील बच्छराज धर्मशाळा येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
 
Powered By Sangraha 9.0