अक्कलकोट ’स्वामी समर्थ मंदिर’च्या वेळेमध्ये बदल

15 Mar 2026 19:15:25
सोलापूर
Akkalkot अक्कलकोटमधील स्वामी समर्थ मंदिरात राज्यासह देशभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात. भाविकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पुढच्या आठवड्यामध्ये सलग तीन दिवस सण असल्यामुळे मंदिर दोन तास भाविकांना दर्शनासाठी बंद असणार आहे. सलग सणांच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर समितीने भाविकांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यामुळे भाविकांना दर्शनासाठी मंदिर २४  तास नाही तर, सलग २२  तास मंदिर उघडं राहणार आहे.
 
swami mandir 
Akkalkot येत्या आठवड्यात तीन दिवस महत्त्वाचे सण आहेत. आठवड्याच्या शेवटी म्हणजेच, गुरुवार (१९ मार्च) गुढीपाडवा, शुक्रवार (२०  मार्च) स्वामी समर्थ प्रकट दिन, शनिवार (२१  मार्च) रमजान ईद आणि रविवार (२२ मार्च) असे चार दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे मंदिर रात्रीच्या वेळी बंद असणार आहे. सलग तीन दिवस (गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार) सणांच्या पार्श्वभूमीवर स्वामी समर्थ मंदिर मध्यरात्री १२  ते २ बंद ठेवण्याच्या निर्णय अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिर समितीने घेतला आहे. राज्यभरातून आणि देशभरातून येणाऱ्या भक्तांसाठी २२  तास स्वामींचे दर्शन खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.
Akkalkot अलीकडेच त्र्यंबकेश्वरच्या महादेव मंदिरातील सुरक्षारक्षकाने भाविकाला केलेल्या मारहाणीचा प्रकार ताजाच असताना अक्कलकोट मंदिर प्रशासनाने काळजी घेतली आहे. गुढीपाडवा, स्वामी समर्थ प्रकट दिन, रमजान ईद आणि रविवार असे चार दिवस सलग सुट्ट्या असल्यामुळे मंदिर प्रशासनाने मंदिराच्या वेळेमध्ये आणि पुरुष- महिलांसाठी स्वतंत्र रांगेच सोय करण्यात आली आहे. दरम्यान, भक्तांची संभाव्य गर्दी लक्षात घेता महिला आणि पुरुष भक्तांसाठी स्वतंत्र रांगेची सोय करण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0