अक्षय खन्नासोबत काम करणे कठीण

फराह खानचा ९० च्या दशकातील अनुभव

    दिनांक :15-Mar-2026
Total Views |
मुंबई
Akshaye Khanna बॉलिवूड अभिनेता अक्षय खन्ना सध्या त्याच्या आगामी ‘धुरंधर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माते फराह खान यांनी ९० च्या दशकातील अक्षय खन्नासोबत काम करतानाचा एक अनुभव नुकताच एका पॉडकास्टमध्ये शेअर केला आहे. त्या काळात अक्षय खन्नासोबत काम करणे आपल्यासाठी किती कठीण होते, याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
 

Akshaye Khanna Farah Khan controversy 
रणवीर इलाहाबादियाच्या पॉडकास्टवर बोलताना फराह खान म्हणाल्या की, ९० च्या दशकात त्यांनी अक्षय खन्नासोबत दोन-तीन चित्रपटांमध्ये काम केले होते. मात्र त्या काळात त्याचा स्वभाव खूप वेगळा असल्याचे त्या सांगतात. “मी अक्षय खन्नासोबत काही चित्रपटांमध्ये काम केले आणि त्यानंतर मला मानसिकदृष्ट्या खूप त्रास झाला. तो खूप अंतर्मुखी होता, पण सेटवर तो चांगला माणूस नव्हता. जेव्हा जेव्हा मला कळायचे की एखाद्या चित्रपटात अक्षय खन्ना आहे, तेव्हा मी निर्मात्यांना सांगायचे की माझ्याकडे तारखा नाहीत,” असे त्यांनी सांगितले.
फराह खान यांच्या मते, त्या काळात अक्षय खन्ना अनेकदा चिडचिड करत असे. “मला आठवतं, त्याने स्वतः एकदा सांगितलं होतं की त्याचे केस गळत आहेत आणि त्यामुळे तो त्रस्त असायचा. कधी कधी तो संवादांबद्दल नाराजी व्यक्त करत वस्तू फेकायचा आणि ‘हा कसला संवाद आहे?’ असे म्हणायचा. त्या काळात त्याचा स्वभावच तसा होता,” असे फराह यांनी सांगितले.
 
मात्र नंतर फरहान अख्तर Akshaye Khanna दिग्दर्शित ‘दिल चाहता है’ या चित्रपटादरम्यान त्यांचं मत बदललं, असेही त्यांनी स्पष्ट केले. या चित्रपटातून फरहान अख्तरने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. त्यामुळे हा प्रकल्प नाकारण्याचा प्रश्नच नव्हता, असे त्या म्हणाल्या.फराह खान यांनी सांगितले की, त्या वेळेपर्यंत अक्षय खन्नामध्ये मोठा बदल झाला होता. “त्याने केस गळण्याची गोष्ट स्वीकारली होती आणि तो खूपच शांत व आरामशीर झाला होता. ‘दिल चाहता है’च्या चित्रीकरणादरम्यान तो खूपच स्थिर आणि शांत दिसला. पूर्वी एखाद्या दृश्यात पाऊस किंवा पाणी असेल तर तो नेहमी टोपी घालायचा, जसे ‘ताल’ चित्रपटातील पावसाच्या गाण्यात दिसते. पण ‘दिल चाहता है’नंतर त्याच्यात मोठा बदल झाला,” असे त्यांनी सांगितले.अक्षय खन्ना हा उत्तम नर्तक असल्याचेही फराह खान यांनी नमूद केले. “‘कोई कहे कहता रहे’ हे गाणे पाहिले तर त्यात तो आमिर खान आणि सैफ अली खानपेक्षाही चांगला नाचताना दिसतो,” असे त्या म्हणाल्या.दरम्यान, अक्षय खन्नाच्या या जुन्या आठवणींची चर्चा सध्या सोशल मीडियावरही रंगताना दिसत आहे. फराह खान यांनी सांगितलेल्या या अनुभवामुळे पुन्हा एकदा ९० च्या दशकातील बॉलिवूडच्या पडद्यामागील अनेक किस्स्यांकडे चाहत्यांचे लक्ष वेधले गेले आहे.