"सर्व भारतीय खेळाडू अभिषेक शर्माचा हेवा करतात," संजू सॅमसनने केला मोठा खुलासा

15 Mar 2026 12:17:41
नवी दिल्ली, 
abhishek-sharma-sanju-samson भारताचा सलामीवीर फलंदाज संजू सॅमसनने २०२६ च्या टी-२० विश्वचषकातील भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने सेमीफायनल आणि फायनलसह सलग तीन अर्धशतके झळकावली. संजूच्या शानदार फलंदाजीमुळे टीम इंडियाला तिसरे टी-२० विश्वचषक विजेतेपद मिळाले. आता, संजूने त्याचा सहकारी अभिषेक शर्माबद्दल एक महत्त्वाचे विधान केले आहे.
 
abhishek-sharma-sanju-samson
 
भारतीय संघातील सलामीवीर अभिषेक शर्माच्या लोकप्रियतेबाबत संजू सॅमसनने एक रंजक खुलासा केला आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादामुळे पूर्वी संघातील अनेक खेळाडूंना अभिषेकचा हेवा वाटत असल्याचे सॅमसनने सांगितले. त्याने मजेशीर अंदाजात अभिषेकला लवकर लग्न करण्याचा सल्लाही दिला. abhishek-sharma-sanju-samson टी-२० विश्वचषकाच्या गट टप्प्यात अभिषेकने फक्त एक अर्धशतक झळकावले होते. मात्र अंतिम सामन्यात त्याने स्फोटक खेळी करत आपली क्षमता दाखवून दिली. डावखुऱ्या फलंदाजाने अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक ठोकत संघाला जोरदार सुरुवात करून दिली. या खेळीमुळे भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत झाली.
सॅमसनने दोघांमधील समन्वयाबाबत बोलताना सांगितले की, मैदानावर त्यांची जोडी आग आणि बर्फ अशी आहे. कधी एक जण आक्रमक खेळतो तर कधी दुसरा. दोघेही खेळ साधा ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या केरळ-पंजाब मैत्रीमुळे त्यांची समजूत अधिक मजबूत झाली आहे. अभिषेकचे व्यक्तिमत्त्व धाडसी असल्याचेही सॅमसनने सांगितले. एका कार्यक्रमात बोलताना सॅमसन म्हणाला की, पूर्वी मैदानावर अभिषेकसाठी प्रेक्षकांचा मोठा जयघोष होत असे. abhishek-sharma-sanju-samson त्यामुळे संघातील खेळाडूंना आश्चर्य वाटायचे आणि थोडा हेवाही वाटत असे. मात्र आता तो संघाचा सुपरस्टार बनला आहे, असे त्याने हसत सांगितले.
अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसनच्या जोडीने ८ मार्च रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या अंतिम सामन्यात जोरदार खेळी केली. दोघांनी मिळून पहिल्या गडीसाठी ९८ धावांची भागीदारी केली आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दबाव आणला. त्यांच्या आक्रमक सुरुवातीमुळे भारताने २५५ धावांचा भक्कम डोंगर उभा केला आणि अखेर सामना ९६ धावांनी जिंकत विजय मिळवला.
Powered By Sangraha 9.0