पुसदमध्ये गॅस सिलेंडर साठेबाजांना दणका

15 Mar 2026 14:40:12
तभा वृत्तसेवा
पुसद,

gas cylinder नूर कॉलनी येथे अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरची साठेबाजी करणाèयांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांच्या कारवाई 40 सिलेंडर व 23 रेग्युलेटर असा एकूण 2 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवार, 13 मार्च रोजी दुपारी 12 च्या दरम्यान करण्यात आली.
 

gas cylinder black market, Pusad police action 
सुभाष वार्डातील नूर कॉलनीत राहणाèया आसिफ मोहम्मद कच्ची या साठेबाजी करणाèयाला अटक केले आहे. स्थानिक गुन्हे शाखा पथकाच्या माहितीनुसार शुक्रवारी गॅस सिलेंडरची साठवणूक करून काळ्या बाजारात विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने पुरवठा निरीक्षक तसेच कर्मचारी व अधिकाèयांसह हा छापा टाकला होता.
छापा दरम्यान आसिफ मोहंमद याच्या घरात अवैधरित्या भारत गॅस, एचपी व इंडियनऑईल अशा वेगवेगळ्या कंपन्यांचे एकूण 40 सिलेंडर आढळल्याने खळबळ उडाली आहे. सोबतच पथकाने 23 रेग्युलेटरदेखील जप्त केले आहेत. अटक केलेल्या व्यक्तीला गॅस सिलेंडर कुठून आणले असे विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली होती. त्यामुळे पथकाला शंका आल्याने 2.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहपोलिस निरीक्षक धीरज बांडे, उपनिरीक्षक शरद लोहकरे, मुन्ना आडे, संतोष बोरगे, तेजाब रणखांब, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनील पंडागळे, रवींद्र श्रीरामे, मनीषा वाघमारे, आरसीपीचे संदली चांदले, निरीक्षण अधिकारी अमोल महाजन, पुरवठा निरीक्षक आशिष पवार, संगीता तेर, अव्वल कारकून छाया जामकर, लिपिक अमित अजमिरे, छाया लोंढे, गोदाम व्यवस्थापक सतीश आळणे यांनी केली.
Powered By Sangraha 9.0