अनिल कांबळे,
नागपूर,
gold-chain-thief : गणेशपेठ परिसरात साेनसाखळ्या हिसकावून पळ काढणाèया दाेन चाेरट्यांना गणेशपेठ पाेलिसांनी ताब्यात घेतले. यात एक साेनसाखळी चाेर विधिसंघर्षग्रस्त बालक आहे. या दाेघांनी हिसकावलेल्या साेनसाखळी, दुचाकी आणि माेबाईलसह एकूण 2 लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांनी जप्त केला आहे.
राजेश उफर् बाब्या नारायण उडके (23) रा. नंदनवन असे या साेनसाखळी चाेराचे नाव आहे. अल्पवयीन साथिदाराच्या मदतीने त्याने 8 मार्चला पहाटे चारच्या सुमारास एम्प्रेस सीटी गेट ते लाेटस चाैकादरम्यान काैस्तुभ विलास काळे यांच्या गळ्यातील साेनसाखळी हिसकावली हाेती. काळे हे मेयाे रुग्णालयात कर्तव्यासाठी जात हाेते. इम्प्रेस सिटी गेट ते लाेटस चाैकादरम्यान रस्त्यावरील खड्ड्यामुळे ते घसरून पडले. त्याच वेळी काळ्या रंगाच्या दुचाकीवर आलेल्या राजेश आणि त्याच्या अल्पवयीन साथीदार या दाेघांनी त्यांच्या गळ्यातील दाेन ताेळे वजनाची साेन्याची साखळी हिसकावून पळ काढला. या प्रकरणी गणेशपेठ पाेलिसांनी गुन्हा दाखल केला हाेता.
सीसीटीव्हीद्वारे आराेपी गजाआड
पाेलिस उपनिरीक्षक विजेंद्र नाचण, समिर शेख यांच्या पथकाने परिसरातील 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही ुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे शेख यांनी राजेश उफर् बाब्या उडके याला हेरले. ताब्यात घेऊन चाैकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पाेलिसांनी दाेघांनाही ताब्यात घेत त्यांची चाेरलेली दाेन ताेळ्याची साेनसाखळी, भ्रमणदूरध्वनी आणि चाेरीत वापरलेली दुचाकी असा 2 लाख 80 हजारांचा मुद्देमाल जप्त केला.